Subscribe Us

header ads

बीड शहरातील बायपास टू बायपास रस्ता कामास अखेर सुरूवात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना मोठे यश; मान्यवरांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी):- बीड शहरातील बायपास टु बायपास रस्त्याचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता. खा.शरदचंद्रजी पवार, खा.सुप्रियाताई सुळे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी भेट घेवून सदर रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावला होता. परंतु तांत्रिक अडचणीमुळे कामास सुरूवात होत नव्हती. आता 
तांत्रिक अडचणी दुर झाल्याने प्रत्यक्ष कामास सुरूवात करण्यात आली आहे. आ.संदिप क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना हे मोठे यश असून रस्ता काम पुर्ण झाल्यानंतर शहरातील नागरिकांना, वाहनधारकांना मोठा आधार मिळणार आहे. या रस्ता कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत भुमीपुजन करून करण्यात आला आहे. बीड शहरातून सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग (52) जातो. या रस्त्याला बीड शहरामध्ये बाह्यवळण झाल्यानंतर बीड शहरातील अंतर्गत बायपास टु बायपास रस्त्याचा प्रश्‍न गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित होता. या रस्त्यावर 

मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन धारकांनाही चालणे कठीण झाले होते. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून सदर रस्त्याचा प्रश्‍न निकाली निघाला आहे. या रस्ता कामाचा शुभारंभ आ.संदिप भैय्या क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.उषाताई दराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड.डी.बी.बागल यांच्या उपस्थितीत करण्यात आला. हा रस्ता जिरेवाडी महालक्ष्मी चौक-जालना रोड-छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा-बार्शी रोड-बार्शी नाका ते 

कोल्हारवाडी बायपासपर्यंत होणार आहे. या रस्ता कामाला सुरूवात झाल्याने रस्ता काम पुर्ण झाल्यानंतर शहरातील वाहनधारकांना तसेच नागरिकांना मोठा आधार मिळेल. या रस्ता कामाचा शुभारंभ करतेवेळी वैजीनाथ नाना तांदळे, कल्याण आखाडे, बबन बापु गवते, बाजीराव बोबडे, महादेव उबाळे, अशोक वाघमारे, सचिन शोळके, मदन जाधव, अशोक रोमण, झुंजार धांडे, खुर्शीद आलम, नंदकुमार कुटे, जावेद कुरेशी, बरकत पठाण, सखाराम मोहिते, गणेश कदम, बबन डोईफोडे, किशोर काळकुटे, अशोक बोबडे, दादा गाडे, अशोक ढास, संदिप पाटील, सखाराम कोरडे, बप्पा बोबडे यांच्यासह बीड शहातील नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

*सदर काम लवकर व दर्जेदार करून घेण्यासाठी स्वत: लक्ष घलणार-आ.संदिप क्षीरसागर*

बीड शहरातील अंतर्गत बायपास टु बायपास रस्ता काम लवकरात लवकर व अतिशय दर्जेदार पद्धतीने व्हावे या साठी मी स्वत: लक्ष घालणार आहे. यात कसल्याही प्रकारची दिरंगाई चालणार नाही. काम गुणवत्ता पुर्ण व्हावे अशा सूचनाही यावेळी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. 

*खा.पवार साहेब, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आभार*

बीड शहरातील बायपास टु बायपास रस्ता काम राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय नेते खा.शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विशेष भेट घेवून सविस्तर मागणी होती. या कामासाठी निधी देवून मंजुरी दिल्याबद्दल व त्यासाठी सहकार्य केल्याबद्दल खा.शरदचंद्रजी पवार साहेब, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, खा.सुप्रियाताई सुळे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे आ.संदिप क्षीरसागर यांनी आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा