Subscribe Us

header ads

ढेकनमोहा येथे ई-श्रम कार्डचे मोफत वाटप; व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा भव्य सत्कार

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

ढेकनमोहा येथे ई-श्रम कार्डचे मोफत वाटप; व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा भव्य सत्कार



वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड तालुक्यातील ढेकणमोहा येथे ई -श्रम मोफत वाटप करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण नाना डाके, अॅड. राजेंद्र राऊत (माजी जिल्हा परिषद सदस्य नाळवंडी), दैनिक झुंजार नेता चे उपसंपादक आत्माराम वाव्हळ,  दैनिक पुण्यभूमि चे कार्यकारी संपादक जितेंद्र शिरसाट, निळूभाऊ सावरगेकर, पंजाब काकडे (शिवसेना तालुका संघटक बीड) यांची प्रमुख उपस्थिती होती. देशातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ई-श्रम योजना सुरू केले आहे. कोरोना काळात असंघटित क्षेत्रातील कामगारांची मोठ्या प्रमाणात हाल झाले भविष्यात त्यांना अशा प्रकारे पुन्हा अडचणींना सामोरे जाऊ नये यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावर विक्रेते आणि घरगुती कामगार, दूधवाला, ट्रक चालक, मच्छिमार, कृषि कामगार आदि आणि इतर कामगार हे आपली नोंदणी करू शकतात. ई-श्रम कॅम्पचे आयोजन ढेकनमोहा येथे करण्यात आले होते. आज विविध मान्यवरांच्या हस्ते ई-श्रम कार्डचे मोफत वाटप करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास देवकते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अरुण नाना डाके (कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती बीड), अॅड. राजेंद्र राऊत जिल्हा परिषद माजी सदस्य, नागेश शिंदे माजी सरपंच ढेकणमोहा.पंजाब काकडे (तालुका संघटक शिवसेना बीड),हानुमान देवकते जेष्ठ नेते शिवसेना . रामा भोगे ग्रामपंचायत सदस्य  . नारायण देवकते (चेअरमन), भास्कर देवकते (संचालक), दिलीप देवकते, आनंत करांडे, पत्रकार विनोद शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ज्ञानेश्वर देवकते, भगवान थापडे, बाळासाहेब गाडीवान, वैभव सोनवणे, लहू देवकर, सुशील धिवार, विठ्ठल होन्डंरे, राहुल शिंदे, चंद्रकांत शिंदे, रामेश्वर शिंदे, नवनाथ काळे, शंकर थापडे, शुभांगी शिंदे, वंदना शिंदे, आशा तावरे, निर्मला शिंदे, सत्यभामा शेळके, शोभा गायकवाड, विकास देवकते, जगन्नाथ थापडे, सुधीर मिसळे, महेश मिसळे, अभिषेक देवकते, मोहन देवकते, अशोक शिंदे, कचराप्पा शिंदे, नवनाथ शिंदे, कपिल शिंदे यांच्यासह गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामा भोगे यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद शिंदे यांनी केले. हनुमान देवकते यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा यावेळी सत्कार

यावेळी यशवंत रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल झुंजार नेताचे उपसंपादक आत्माराम वाव्हळ, दैनिक पुण्यभूमि चे कार्यकारी संपादक जितेंद्र शिरसाठ यांना पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने मूकनायक पुरस्कार, लेखक व सिनेअभिनेता निळूभाऊ सावरगेकर यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल यांचा यावेळी समस्त ढेकनमोहा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा