Subscribe Us

header ads

उघडा डोळे बघा नीट,पोट निवडणुकीतील सातही ग्रा.पं.सदस्य आ.संदिप भैय्या क्षीरसागरांसोबतच नवनिर्वाचीत सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार; विरोधक पडले तोंडावर

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी):- बीड विधानसभा मतदार संघातील नवगण राजुरीसह इतर काही ग्रामपंचायत सदस्यांची पोट निवडणुक झाली. या पोट निवडणुकीत विरोधकांनी आमचे ग्रा.पं.सदस्य जास्त निवडुण आल्याचा दावा केला होता. खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच पोट निवडणुकीतील सातही ग्रा.पं.चे सदस्य असून हे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या सोबत असल्याचे जाहिर करण्यात आले होते. तरीही आता उघडा डोळे बघा नीट यासर्व नवनिर्वाचीत सदस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सन्मान करण्यात आला आहे. या निमित्ताने आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांची ग्रामीण भागात पुन्हा आपली ताकद कायम असल्याचे सिद्ध झाले आहे. शनिवार दि.25 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी भवन बार्शी रोड,बीड येथे पोट निवडणुकीतील नवनिर्वाचीत ग्रा.पं.सदस्यांचा माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. बोरफडी येथील गोरख घुगे, राजुरी नवगण येथील वैशाली ज्ञानेश्वर बहिर, कोळवाडी येथील अशोक नांदे, भंडारवाडी येथील रंजना गमे, वायभटवाडी येथील शितल जागडे, पाडळी येथील दिपाली इंगळे व सुजाता सरवदे तसेच कामखेडा येथील रहिमाखॉ अफजलखॉ पठाण व वासनवाडी येथील पोट निवडणुकीतील ग्रा.पं.सदस्यांचा सत्कार करून राष्ट्रवादीच्या गमजा घालून सन्मान करण्यात आला. विरोधकांनी केलेला दावा पुर्णपणे फेल ठरला असून ते विरोधक तोंडावर पडले आहेत. ग्रामीण भागातील जनता आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या सोबत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नवगण राजुरी येथील पोट निवडणुकीत तर माजी मंत्री आणि विद्यमान बीडचे नगराध्यक्ष या क्षीरसागर बंधुंनी पुर्ण ताकद पणाला लावली होती. परंतू पुतण्या आ.संदिप क्षीरसागर यांनी या दोघांना धोबीपछाड करत पोट निवडणुकीत विजय मिळवला. राष्ट्रवादी भवन येथे करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बबनरावजी गवते, रामदासदादा हंगे, बाजीराव बोबडे, विश्वास आखाडे, उत्तरेश्वर सोनवणे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा