Subscribe Us

header ads

गायकवाड जळगाव च्या कवयित्री कु,प्रिती टेकाळे यांना यशवंत रत्न पुरस्कार जाहीर; शेतकर्‍याच्या मुलीची साहित्य क्षेत्रात उतुंग भरारी

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड (प्रतिनिधी):- गायकवाड जळगाव ता गेवराई येथील रहिवासी असलेल्या व सध्या बोधेगाव येथे बी फार्मसी तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या,कु प्रिती रोहिदास टेकाळे यांना जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान बीड यांच्यामार्फत प्रतिवर्षी दिला जाणारा यशवंत रत्न पुरस्कार जाहीर झाला असून त्यांचं सर्व स्तरावर कौतुक होत आहे,कु प्रीती रोहिदास टेकाळे यांचा जन्म सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला असून जगावेगळे काहीतरी करण्याचं ध्येय उराशी बाळगून अनेक कार्यांमध्ये नेहमीच अग्रेसर असणं हा त्यांचा स्वभाव त्यांनी आजवर अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकी जपून ठेवली आहे आपल्या लेखणीतून त्यांनी आजवर अनेक अन्याय पीडित गोरगरीब जनतेवर होणाऱ्या अन्याय विरुद्ध आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यास नेहमीच अग्रेसर असतात, त्यांनी कवयित्री, लेखिका, पत्रकार , अशा भूमिका पार करत जगावेगळा ठसा त्यांनी उमटविला आहे , त्यांच्या या कार्याची दखल घेत जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान बीड यांच्यामार्फत प्रतिवर्षी दिला जाणारा यशवंत रत्न पुरस्कार यावर्षी यांना प्राप्त झाला असून त्यांचं बीड जिल्हाभरात कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा