Subscribe Us

header ads

कष्टकरी कामगारांचा परिपूर्ण विकास हाच आमचा ध्यास--- डॉ सारिकाताई क्षीरसागर

बीड स्पीड न्यूज 


नगरसेवक अँड विकास जोगदंड यांच्या पुढाकारातून पेठ बीड भागात सुमारे पाच हजार श्रमिकांची नोंदणी अभियानाचा समारोप व प्रभागातील आदर्श कुटुंबीयांचा सन्मान अभियांनास प्रारंभ

बीड (प्रतिनिधी) 20 डिसेंबर पेठ बीड भाग हा तमाम कष्टकरी कामगार बांधवांचा असुन या भागासाठी लोकनेते जयदत्त अण्णा क्षीरसागर,नगराध्यक्ष डॉ भारतभुषण क्षीरसागर,युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून सर्वाधिक विकास कामे  झाली असुन कष्टकरी कामगार बांधवांचा परिपूर्ण विकास हाच आमचा ध्यास असुन विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे डॉ सारिकाताई क्षीरसागर यांनी नागोबा गल्ली 

प्रभाग क्र 4 मध्ये आयोजित श्रमिक ई नोंदणी अभियान समारोपा प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शनपर बोलतानां सांगितले पुढे बोलतानां  डॉ.सारिकाताई क्षीरसागर म्हणाल्या की, जनतेसाठी आमच्या घराचे आणि दवाखान्याचे दरवाजे नेहमी खुले आहेत असे प्रतिपादन केले.आमदारकीच्या वेळी नेतृत्व निवडताना झालेल्या चुकीची कल्पना जनतेला झाली आहे याची ते पदोपदी खंत व्यक्त करत आहेत. पुन्हा तीच चूक होऊ नये यासाठी कार्यकर्ते आणि सुजाण जनतेने जागरूक राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी कार्यक्रमाचे 

प्रास्ताविक आयोजक नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी केले तर सूत्रसंचालन आदर्श जोगदंड यांनी केलेव्या सपीठावर नगरसेविका सखुबाई चांदणे,प्रेमलताताई चांदणे,संगीताताई वाघमारे जेष्ठ सिने कलाकार अशोक कांबळे,जेष्ठ पत्रकार द्वारकदास फटाले,श्रीराम कुरे,सह 

आदींची उपस्थिती होती यावेळी डॉ सारिकाताई क्षीरसागर,यांच्या हस्ते ई श्रम कार्ड चे वाटप करण्यात आले तसेच प्रभाग क्र 4 मधील आदर्श कुटुंब सोजरताई गौतम सोनवणे,नंदाताई विलास जाधव, पठाण मुमताज जाफर,कांताताई बलभीम जोगदंड यांचा सन्मान पत्र देऊन गौरव करत या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला यावेळी महादेव वाघमारे,मंगेश जोगदंड,सिद्धार्थ सूर्यवंशी,सचिन जाधव,महादेव वंजारे,गोरख जोगदंड,राजु जोगदंड,आकाश गायकवाड, सुरज वंजारे,जानू जोगदंड,विशाल जोगदंड, अजय जोगदंड,प्रविण जोगदंड,मुकेश जोगदंड,नितीन गायकवाड,राजेश कोकाटे,राहुल जोगदंड,आदित्य जोगदंड,कमलताई जोगदंड,सारिकताई जोगदंड,नंदाताई जाधव,जलसाबाई इनकर,सोजरबाई जोगदंड,शिल्पा ताई जोगदंड,पार्वतीबाई जोगदंड,सोनी जोगदंड,रेश्मा जोगदंड,यांचे सह कामगार माता भगिनीं बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा