Subscribe Us

header ads

नगरपंचायत निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रावर भाजप- राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत हाणामारी!

बीड स्पीड न्यूज 

बीड 21 डिसेंबर _ महाराष्ट्रातील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेदरम्यान बीडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला आहे. भाजप - राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि त्यानंतर मतदान केंद्राच्या गेटवरच दोन्ही गटांत जोरदार हाणामारी झाली आहे. 
मतदान केंद्राच्या गेटवर भाजप आणि 

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून सोम्य लाठीचार्जही करण्यात आला.

बीड जिल्ह्यातील 5 नगरपंचायतीसाठी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात

बीड जिल्ह्यात आज 5 नगरपंचायतीसाठी प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील वडवणी, केज, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार या 5 ठिकाणच्या नगरपंचायतीसाठी हे मतदान होत आहे. या 5 नगरपंचायतमध्ये एकूण 85 उमेदवार आहेत. त्यापैकी 20 जाग्यावर ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने, निवडणूक होणार नाही. मात्र उर्वरित 65 जागांसाठी बीड जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी तब्बल 216 उमेदवार आपलं भविष्य आजमावत असून निवडणूक रिंगणात उभे आहेत. तर या मतदानाला सकाळी 7:30 पासून सुरुवात झाली असून सायंकाळी 5:30 पर्यंत चालणार आहे.

पाच नगर पंचायतसाठी 65 जागांसाठी 216 उमेदवार निवडणूक रिंगणात

1) पाटोदा नगर पंचायत

एकूण जागा-17

ओबीसी आरक्षण स्थगित - 4

निवडणूक -13 जागेसाठी 21 डिसेंबरला मतदान..

तर यासाठी 44 उमेदवार भविष्य आजमावत आहेत

भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब अजबे यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा लढत

राखीव 4 जागेसाठी- 18 जानेवारी मतदान

2) वडवणी

एकूण जागा - 17

ओबीसी - 4 जागा राखीव

13 जागेसाठी 21 डिसेंबर तारखेला मतदान

33 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

यासाठी राष्ट्रवादीचे आ.प्रकाश सोळंके ची प्रतिष्ठा पणाला लागली असून भाजपा महाविकास आघाडीत लढत होत आहे.

ओबीसीं राखीव 4 जागेसाठी 18 जानेवारीला मतदान

3) केज

एकूण जागा -17

ओबीसी - 4

13 जागेसाठी 21 डिसेंबरला मतदान

60 उमेदवार आपलं भविष्य आजमावत आहेत.

केजमध्ये महाविकास आघाडीमधील काँग्रेस राष्ट्रवादी, शिवसेना अंतर्गत लढत आहे..भाजपचा एकही उमेदवार नाही

ओबीसी राखीव 4 जागेसाठी 18 जानेवारी मतदान

4)शिरूर (कासार)

एकूण जागा-17

ओबीसी राखीव-4

13 जागेसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान

37 उमेदवार आपले भविष्य आजमावत आहेत

भाजप, महाविकासआघाडीत लढत आहेत.

माजी मंत्री सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब अजबे यांच्यात लढत आहे.

ओबीसी राखीव 4 जागेसाठी-18 जानेवारीला मतदान होत आहे.

5) आष्टी

एकूण-17

ओबीसी राखीव-4

13 जागेसाठी 21 डिसेंबर मतदान

42 उमेदवार भविष्य आजमावत आहेत.

भाजपा-राष्ट्रवादी मध्ये लढत आहेत.

भाजपा आमदार सुरेश धस राष्ट्रवादीचे आ.बाळासाहेब अजबे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

उर्वरित 4 जागांसाठी 18 जानेवारीला मतदान होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा