Subscribe Us

header ads

विकासपुरूषाने,दुसर्‍याच्या खांद्यावर बंदुक ठेवून बडबड करण्यापेक्षा स्वत: काय दिवे लावले ते सांगावं---राष्ट्रवादीचे नेते भाऊसाहेब डावकर,तालुकाध्यक्ष महादेव उबाळेंचे सडेतोड पत्रक

बीड स्पीड न्यूज 

राष्ट्रवादीचे नेते भाऊसाहेब डावकर,तालुकाध्यक्ष महादेव उबाळेंचे सडेतोड पत्रक किंवा रोजगार हमीवर काम केलेल्या मंत्र्यांनी केवळ पांदण रस्ता बद्दलच बोलावे जनतेने रोजगार घातला तरी श्रेय घ्यायची सवय काही गेली नाही भाऊसाहेब डावकर,महादेव उबाळे


बीड (प्रतिनिधी):- स्वतःला विकासपुरुष म्हणून घेणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांनी निदान आता तरी आपण सत्तेत नाहीत हे ओळखणे गरजेचे आहे, कारण मागील काही दिवसांपासून आमदार संदीप क्षीरसागर यांनी विकास कामांचा जो धडाका लावला आहे तो बघवत नसल्याने उद्घाटन होत असलेले सर्व विकास कामे मीच खेचून आणले आहेत अश्या अविर्भावात रोजगार हमीवर काम केलेल्या माजी मंत्र्यांनी बोलणे योग्य नाही ,त्यांनी केवळ पांदण रस्त्या पुरतेच बोलावे. स्वतःला अभ्यासू म्हणून घेणाऱ्या या स्वयंघोषित विकासपुरुषांने दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून बडबड करू नये,महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पूर्वीचे सर्व प्रस्तावित कामे कोविड 19 ला निधी वळवल्याने रद्द केले होते,परंतु बीड तालुक्यातील सर्व कामे आ. संदीप भैयानी पुनर्जीवित करून घेतली,याचा तरी अभ्यास करावा आणि अभ्यास करून याचे धडे आपल्या बगलबच्च्यांना द्यावेत म्हणजे त्यांनादेखील थोडेफार ज्ञान प्राप्त होईल असा सल्ला राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महादेव उबाळे व भाऊसाहेब डावकर यांनी दिला आहे.पुढे पत्रकात म्हटले आहे की,मागील सरकारच्या काळात  बीड जिल्ह्यातील रस्त्याची कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत प्रस्तावित केली. सरकार बदलल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने सर्व कामे रद्द करून हा निधी आरोग्याच्यादृष्टीने कोव्हिड-19 साठी वळवण्यात आला. यावर आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी बीड मतदार संघातील बीड व शिरूर कासार तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था पाहून मागील सरकारच्या काळात रस्त्यासाठी दाखल केलेले प्रस्ताव पुर्नजिवित केले. त्यासाठी भांडून निधी आणला, एक-दोन नव्हे तर रस्त्यासह बंधारे व ग्रामीण व शहरी भागातील विविध विकास कामांसाठी निधी खेचून आणला आणि या विकास कामांचा चौसाळ्यातून दोन दिवसापूर्वी शुभारंभ करण्यात आला. विकास कामे सुरू होत असतांना विकास पुरूष म्हणून घेणार्‍यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? विकास पुरूषांनी आजपर्यंत केवळ पोकळ आश्‍वासने आणि जनतेला वेड्यात काढण्या पलीकडे कोणताच विकास केला नाही. विकास पुरूषाने दुसर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेवून बडबड करण्यापेक्षा 30 वर्षाच्या काळात बीड मतदार संघावर सत्ता असतांना आपण काय दिवे लावले हे अगोदर सांगावं. पांदन रस्त्यापलीकडे आपण काय विकास कामे खेचून आणली हे जनतेला चांगल्या प्रकारे माहित आहे. कोव्हिड काळातही बीड मतदार संघासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी नव्याने व जुने दाखल असलेले प्रस्ताव पुर्नजिवित करून रस्त्यांसाठी व विविध विकास कामांसाठी निधी खेचून आणला. म्हणूनच आज मतदार संघात विकास कामांना गती मिळाली आहे. केवळ राजकीय भावनेतून आरोप करणार्‍यांनी जनाची नाही तर मनाची तरी बाळगावी प्रत्येक विकास काम आ.संदिप भैय्यांच्या माध्यामतून दर्जेदारच होणार आहेत. त्यात कसल्याचही प्रकारची कोणाचीही गय केली जाणार नाही. विकास पुरूषाला मतदार संघाचा विकास करता आला नाही, आता आ.संदिप भैय्या क्षीरसागर शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून निधी खेचूून आणत विकास कामांना गती देत असतांना त्यात दुसर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आडकाठी आणण्याचे पाप करू नये आणी समूर्तिभ्रष्म झाल्यासख वागू नये, जनतेनं घरी बसवलय याचा विचार करावा, तबेतिची काळजी घ्यावी, तुमचे कार्यकर्ते यांच्यावर  रोहयोवर  जाण्याची वेळ येऊ नये असा टोला ही सडेतोड पत्रकातून राष्ट्रवादीचे नेते तथा संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब डावकर व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव उबाळे यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा