Subscribe Us

header ads

ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराला;ग्रामस्थ वैतागले

बीड स्पीड न्यूज 

किल्ले धारूर/प्रतिनिधी_धारूर शहर अंतर्गत गोपाळपूर ग्रामपंचायत कार्यरत असलेले  सि.डी.माचवे  ग्रामपंचायत गोपाळपुरचे ग्रामसेवक सतत गैरहजर राहत आहे. व सतत गैर हजर राहत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे व तसेस ग्रामसेवक सि.डी. माचवे ग्रामसभा घेण्यामध्ये असमर्थ आहे. आणि ग्रामपंचायात रेकॉर्ड ला ग्रामसभा घेतात असे रेकॉर्ड दाखल करतात तसेस ग्रामसेवक सि.डी माचवे PTR. देण्याकरिता वारंवार टाळाटाळ करत आहे लोकांना PTR देण्या करिता पैसेची मागणी सुधा सि.डी माचवे  करीत आहे. आणि ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांच्या एक फोन वर त्यांना त्यांचे PTR भेटत आहे.अशा आरोप येथिल सामाजिक कार्यकर्त्यानी निवेदनाद्वारे केली आहे.
धारूर शहर लागत असलेल्या गोपाळपूर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक  सी.डी. माचवे हे गोपाळपूर ग्रामपंचायतला सतत गैरहजर राहत असल्यामुळे गावातील ग्रामस्थांना व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. तसेच ग्रामपंचायतचे सर्व रेकॉर्ड दप्तर ग्रामपंचायतमध्ये ठेवणे व ग्रामसेवकास ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहणे बंधनकारक असतांना सदरील ग्रामसेवक महाशय सर्व ग्रामपंचायतचे रेकॉर्ड स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन फिरतात.  बलाढ्य व धनदांडग्या लोकांना भेट होईल तेथे रेकॉर्ड पुरविण्याचे काम करतात. तसेच  फोन करून सुध्दा भेट घेण्यास टाळाटाळ करतात.तसेच वेळेवर मासिक सभा व ग्रामसभा घेत नाहीत. प्रकार सदरील ग्रामसेवक हे मनमानी कारभार करत असुन कोणालाही विश्वासात न घेता बोगस कामे करत आहेत. सदरील प्रकरणामुळे गावाच्या विकासाला खीळ बसवण्याचे काम होत आहे. यामुळे सदरील ग्रामसेवक सी.डी. माचवे यांची बदली करून नवीन ग्रामसेवक  गावला देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केला आहे. यावेळी अमोल सिरसट, महेश सिरसट,सुमित पोटभरे,संजय जाधव,विकास काजळे,कृष्णा वाघमारे, अकबर पठान,अशोक सिरसत ,रवि लोंडे,अनिकेत घुंबरे,आदी ग्रामस्थ दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा