Subscribe Us

header ads

आ.संदिप भैय्यांच्या प्रयत्नातून बीड शहरातील पावणे दोन कोटीच्या विकास कामांचा उद्या शुभारंभ

बीड स्पीड न्यूज 

शाहुनगर, पेठ बीड, माने कॉम्प्लेक्स परिसरातील विकास कामांचा समावेश
माजी आ.सय्यद सलीम,माजी आ.सुनिल धांडे,माजी आ.उषाताई दराडे, अ‍ॅड.डी.बी.बागल यांची उपस्थिती

बीड (प्रतिनिधी):- शहरात व ग्रामीण भागात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामे होत असतांना शहरातील शाहुनगर,पेठ बीड व माने कॉम्प्लेक्स परिसरातील पावणे दोन कोटी रूपयांच्या विकास कामांची सुरूवात आज शनिवार दि.18 डिसेंबर 2021 रोजी पासून होणार आहे. या कामांचा शुभारंभ माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.उषाताई दराडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड.डी.बी.बागल यांच्या उपस्थिती होणार आहे.
बीड शहरात व ग्रामीण भागात आ.संदिप भैय्यांनी विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. पेठ बीड बुरूड गल्लीमध्ये अतुल कुलकर्णी यांचे घर ते काशीनाथ शिंदे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणेे. शाहुनगर भागातील प्रभाग क्र.9 बीड येथील पांगरी रोडजवळील तांबोळी यांचे घर ते सय्यद मुसा यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे., प्रभाग क्र.10 उमाकिरण हॉलजवळील पुजा हुलजुते ते सुरेखा गायकवाड यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे., प्रभाग क्र.13 मध्ये माने कॉम्प्लेक्स ते सुरेशराव काळे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे., प्रभाग क्र.13 मध्ये अरूण भस्मे यांचे घर ते केसोना गॅस एजन्सी (माने कॉम्प्लेक्स भाग) सिमेंट रस्ता करणे., प्रभाग क्र.13 मध्ये कल्याण सानप ते धसे नर्सिंग यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे अशा एकूण पावणे दोन कोटी रूपयांच्या विकास कामांचा शुभारंभ होत आहे. या कार्यक्रमास प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,बीडच्या वतीने करण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा