Subscribe Us

header ads

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केली बीड येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची पाहणी

 बीड स्पीड न्यूज 

बीड, दि. 24:-जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आज बीड येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील पहिला मजला व तळमजला येथे भेट दिली. यावेळी त्यांनी विविध शासकीय कार्यालयांची पाहणी केली. राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी श्री. शर्मा आज मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील कार्यक्रमास आले होते. सदर कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी अचानक 

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील विविध शासकिय कार्यालये, अधिकाऱ्यांची दालने, कार्यालयांचे कक्ष, कर्मचाऱ्यांचे कक्ष, अभिलेख, भांडार शाखा यांना भेट देऊन  उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.  याप्रसंगी त्यांनी तहसीलदार कार्यालयातील तहसीलदार यांचे दालन, निवडणूक शाखा, जिल्हा सैनिक कल्याण 

कार्यालय , तालुका भूमी अभिलेख कार्यालय, तालुका पुरवठा विभाग आदी ठिकाणी भेट दिली.शासकीय कार्यालयांमध्ये मोडकळीस आलेले फर्निचर, अनावश्यक कागदपत्रांचे गठ्ठे,  रद्दी, नादुरुस्त साहित्य वडगळी तील वस्तू निर्लेखित काल केले जावे. तहसिल कार्यालयाची स्वच्छता सुंदरता वाढविण्यासाठी स्वच्छता मोहीम 

राबवावी अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.शासकिय कार्यालये स्वच्छ सुंदर व सुसज्जित करावी, आपले कार्यालय, आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी सर्व संबंधितांनी सजगपणे पार पाडली पाहिजे 

असे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सांगितले.यावेळी कार्यक्रमासाठी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती भारती सागरे, बीड तहसीलदार श्री.सुरेंद्र डोके यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा