Subscribe Us

header ads

कमानीचे स्लॅब कोसळून बांधकाम मजुराचा मृत्यु

बीड स्पीड न्यूज 

बीड_ कमानीचे काम सुरू असताना अचानक स्लॅब अंगावर कोसळून त्याखाली दबल्याने मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील भक्ती कन्स्ट्रक्शन भागात आज सायंकाळी ५ च्या सुमारास घडली.शेख इम्रान शेख मुख्तार (वय २२ वर्ष ) रा. इस्लामपुरा हा तरुण भक्ती कन्स्ट्रक्शन भागात पिंपरगव्हाण रस्त्यावरील कमानीचे स्लॅब टाकण्याचं काम सुरू होते.अचानक कमानीचा स्लॅब कोसळला. लाकड, लोखंडी प्लेट व खडी,वाळू, सिमेंट मिश्रीत स्लॅबचे मटेरियल अंगावर पडल्याने त्याखाली दबल्याने मजुर इम्रान गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित असणारे मजुराने व नागरिकांनी त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे  तपासून डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा