Subscribe Us

header ads

बीड मॅरेथॉन स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा-अशोक सुखवसे

बीड स्पीड न्यूज 

बीड ः आ. विनायकरावजी मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा लोकविकास मंच, मुंबई, कै. आण्णासाहेब पाटील प्रतिष्ठाण व सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने व्यसनमुक्ती अभियान अंतर्गत बीड येथे 26 डिसेंबर रोजी भव्य राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होवून व्यसनमुक्ती अभियानाला बळकटी द्यावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अशोक सुखवसे यांनी केले आहे.समाजातील व्यसनाधिनता कमी व्हावी, नववर्षाच्या निमित्ताने व्यसनाधिनतेकडे वळणारी तरुणाई विधायक कार्याकडे वळावी यासाठी आ. विनायक मेटे हे गेल्या चार वर्षापासून सातत्याने नववर्षाच्या पुर्वसंध्येला व्यसनमुक्ती अभियान  व त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबवत असतात. यावर्षीही बीड येथे 26 डिसेंबर रोजी भव्य राज्यस्तरीय बीड मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगण येथून सकाळी 6 वाजता ही मॅरेथॉन सुरु होणार आहे. यासाठी प्रसिद्ध सिनेअभिनेते देवदत्त नागे यांची उपस्थिती राहणार आहे. तरी नागरिकांनी या स्पर्धेेत मोठ्या संख्येने सहभागी होवून व्यसनमुक्ती अभियानाला बळकटी द्यावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अशोक सुखवसे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा