Subscribe Us

header ads

बीड पिंपळनेर रस्त्यावरचे खड्डे बुजवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड तालक्यातील ग्रामीण भागात सर्व रस्ते पूर्ण खराब झाले आहेत काही रस्त्यावर तर डांबर देखील पाहायला राहिले नाही तरी बांधकाम विभाग .प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करत आहेत. मतदान मागण्यासाठी ग्रामीण भागात येतात आणि विकास करण्यासाठी का येत नाही असे अनेक सवाल या ग्रामीण भागातून होत आहेत. तसेच बीड येथुन मुख्य रस्ता असणारा बीड पिंपळनेर रोड म्हणजे अपघाताचे ठिकाण झाले आहे. या रस्त्याने खड्याचे साम्राज्य झाले आहे. या रस्त्याकडे प्रशासन किंव्हा बांधकाम विभाग दुर्लक्ष करत होते. या रस्त्यासाठी या 

भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा  काढला होता या मोर्चात शेकडो नागरिकांचा सहभाग दर्शवला होता बीड ते पिंपळनेर हा रस्ता मंजुर होऊन या रस्त्याचे अनेक वेळा उद्घाटन होऊन देखील हा रस्ता का होत नाही असे अनेक सवाल करण्यात आले आहेत. आणि या भागातील ग्रामपंचायत ने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदानावर बहिष्कार करत ठराव दिले आहेत. आता या भागातील जनतेची दिशाभुल करण्याचे काम बांधकाम विभाग व प्रशासन करत आहे. या रस्त्याचे काम नव्याने व्हावे अशी मागणी करुन देखील बांधकाम 

विभाग व प्रशासन रस्त्यावरचे थातुर मातुर खड्डे भरून या परिसरातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकवेळा खड्डे भरून देखील ते राहत नाहीत दोन महिन्यात परत तेच खड्डे आणि खड्डे भरण्यासारखा तो रस्ता राहिलेला नाही या रोडवरती खड्या शिवाय काही नाहीच तरी या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण झाले नाही आणि हा रस्ता जर पूर्ण झाला नाही तर या भागातील सर्व नागरिक परत रस्त्यावर उतरून मोर्चे आंदोलन करण्याचे बोलत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा