Subscribe Us

header ads

काँग्रेस कार्यकर्ताचा भरदिवसा गोळ्या घालून खून!!

बीड स्पीड न्यूज 

पुणे_पुण्यातील भारती पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर भरदिवसा एका तरुणावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या गोळीबारात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. समीर मुनीर शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, तो काँग्रेसचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास समीर हा भारती पोलीस चौकीपासून काही अंतरावर असलेल्या एका हॉटेलजवळ थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरून तिघेजण आले. त्यातील एकाने पिस्तूलमधून समीरवर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये समीरखाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.या हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत. तर या हत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. हत्या झालेला तरूण काँग्रेस पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे, असे भारती विद्यापीठ पोलिसांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा