Subscribe Us

header ads

सोनिमोहा येथील चुकिचे गारपीठ ग्रस्थ शेतकर्यांचे पंचणामे करणार्या तलाठीस निलंबित करा-- प्रहारचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

‌  बीड स्पीड न्यूज  ‌    ‌                                           ‌   ‌      
किल्ले धारुर/प्रतिनिधी/ ‌धारूर तालुक्यातील सोनीमोहा गावातील जवळपास  ४०० शेतकरी गारपीठ अनुदानापासून वंचित राहिले आहेत.बांधा शेजारी बांध परंतु एका शेतकऱ्याला अनुदान मिळाले तर दुसऱ्या शेतकऱ्याला अनुदान मिळाले नाही‌.यामुळे सोनिमोहा गावातील शेतकरी संतप्त झालेले आहेत.लाठ्याने पंचनामा न करता बोगस याद्या बनविल्या आहेत. शासनाने गारपीठिने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान रूपी मदत केली आहे.परंतु सोनिमोहा येथील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.तलाठ्यांनी आपल्या मर्जीतील शेतकऱ्यांची नावे अनुदानासाठी घेतल्याचे संपूर्ण सोनिमोहा गावात चर्चा सुरु आहे.तसेच शेतकऱ्यांची नावे समान क्षेत्र असताना देखील काही शेतकऱ्यांना कमी रक्कम तर काही शेतकऱ्यांना जास्त रक्कम अनुदान मध्ये ही तफावत दिसून येत आहे.त्यामुळे येथील सर्व शेतकरी संतप्त झाले आहेत.तलाठ्याने आपल्या मर्जीतील शेतकऱ्यांची अनुदानाची कमी-जास्त रक्कम टाकली असल्याचा आरोप येथील काही शेतकऱ्यांनी केला आहे.यासाठी त्यांनी नेमके कोणते निकष आधारे कमी-जास्त रक्कम टाकली हे मात्र महसूल विभागाला सांगता आले नाही. यावरून चिरीमिरी घेऊन तर जास्त रक्कम टाकली नाही ना अशी चर्चा सोनिमोहा गावात सुरु आहे.संबंधित तलाठ्यावर  कारवाई करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस हनुमंत तोंडे,बीड शहरध्यक्ष दिपक पवार, केज ता.सचिव महादेव डोईफोडे यांनी बीड जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा