Subscribe Us

header ads

सोनारकाम व्यावसायिक महिलांना प्रेरणादायी लेखिका सौ अर्चना ईश्वर सोनार

बीड स्पीड न्यूज 


                    लेखिका

सौ अर्चना ईश्वर सोनार
  पिंप्री चिंचवड (  *योगगुरु*)
     9766677970

( शब्दांकणःआत्माराम ढेकळे )
   मुक्त पत्रकार ,पुणे

पिंप्री चिंचवड_आपल्या भारतीय संस्कृती मध्ये पुरातन काळापासुन सोन्याच्या दागिन्यांना खूप महत्त्व आहे . एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात आपण कितीही नकली (इमिटेशन ज्वेलरी) दागिने घातले तरी आपले सौंदर्य उठून दिसणार नाही .  पण याच ठिकाणी  सोन्याचा दागिना घातला तर आपलं रूप(सौंदर्य)  सर्वांमध्ये उठून दिसते... रोज नवीन नवीन डिझाईन निघत असतात... जशी कपड्यांची फॅशन बदलत असते त्याचप्रमाणे दागिन्यांची सुद्धा बदलत असते.. हीच महिलांची आवड लक्षात घेऊन जर महिलांनी ,  तरुण मुला , मुलींनी हा व्यवसाय आपलं करियर(भवितव्य ) म्हणून आवर्जून निवडावा . यामध्ये शिकण्यासारखे खूप आहे.मध्यंतरी मी एक सोनारी व्यवसायासंबंधी एक व्हिडिओ तयार केला  होता.... त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या सोनारी कामाचे मार्गदर्शन मी स्वतः काम करून केले होते. कारण माझ्या सासरी वरणगाव येथे आमचे स्वतःचे 'पवार ज्वेलर्स 'म्हणून छान छोटेसे दुकान आहे . जेव्हा आम्ही तिथे जातो . तेव्हा आवर्जून सर्व सोनारकाम शिकण्यास मिळते . व यामधुन दागिणे तयार करण्याचे समाधानही मिळते.आणि आमच्या राजूभाऊ कडून मी नियमित प्रशिक्षण घेत असते म्हणूनच  मला आवर्जून आपल्या व्यवसायासंबंधी आपल्या बंधू-भगिनींना व नवीन पिढीला सांगावेसे वाटते की हा व्यवसाय इतर व्यवसायाप्रमाणे अतिशय उत्तम व्यवसाय आहे... यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात शिकायला मिळते... जर तुमचे घरातील मामा  , काका , भाऊ , वडील  , यजमान यांचा जर हा व्यवसाय असेल तर तुम्ही पत्नी  , बहिण , वहिनी , मुलगी , सून या नात्याने त्यांना साथ देऊ शकतात... जेणे करून त्यांना तुमची हळूहळू मदतही होईल आणि तुम्हालाही खूप काही शिकायला मिळेल.आज या व्यवसायाला उत्तम करिअर म्हणून सुद्धा तुम्ही डेव्हलप करू शकतात .कारण आज राजकोटला जर जाऊन पाहिले तर सोनारी कामाच्या डिझाईन संबंधी भरपूर मशीन्स उपलब्ध आहेत. ज्या नाही त्या हजारो -लाखो डिझाइन्स तुम्हाला मिळतील.. या ठिकाणी तुमची कला वापरून अजून नाविन्यपूर्ण 

डिझाईन्स तुम्ही तयार करू शकता.आपण शिकण्यासाठी आधी छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. लहान-सहान वस्तूंना जोडायचं कसं , जर साखळी तुटली असेल तर त्याला डाग कसा द्यायचा , जोडवे ,पट्टी (पैंजन)किंवा अंगठी.. इतर आणखी छोट्या छोट्या गोष्टी  , त्याचप्रमाणे वस्तूंना पॉलिश कशी करायची. तार कसा ओढायचा ,  नवीन टेक्निक  , मशीन्स मुळे आता आपण पाहिजे त्या आकारामध्ये तार ओढू शकतो , देवांसाठी चा ठसा त्यासाठी लागणारा पत्रा देखील आपण ओढू शकतो.
मला फक्त आपल्या महिला वर्गासाठी किंवा नवीन पिढीसाठी आवर्जून इतकेच सांगायचे आहे की हा व्यवसाय आज इतर समाजातील लोकं सुद्धा करत आहेत मग आपण का मागे राहावे.. आपणही यामध्ये खूप काही सुधारणा करू शकतो त्यामुळे निश्चितच आपली प्रगती नक्कीच होऊ शकेल.कारागिरी च्या कामांमध्ये तर तुमच्या जवळचे कलाकौशल्य   वापरून खूप काही नाविन्यपूर्ण तयार करू शकता की जे आजपर्यंत कुणाला ही जमले नाही कदाचित ते तुम्हाला जमू शकते ती संधी आहे तुम्हाला... आपल्या या सोनारकाम  व्यवसायाला लहान समजू नका  . आपल्या संसाराला  हातभार लावण्यासाठी आणि तुमची कला सादर करण्याचं हे खूप छान ठिकाण आहे असं मला वाटतं . सोन्या चांदीचे दागिने तयार करणे हा जरी आपला मूळ पारंपारिक व्यवसाय असला तरी या मौल्यवान धातू पासून ..सुंदर अलंकार बनवण्याचे काम एक श्रेष्ठ कलाकार च करू शकतो तरी सुद्धा सोनाराला कलाकार म्हटले जात नाही तर तो एक उत्तम कारागीर म्हणूनच ओळखला जातो. पुरातन काळात देखील  सुवर्ण अलंकार च्या कला कौशल्यामुळे सोनाराची श्रेष्ठता कायम आहे.महीला सक्षमीकरण मध्ये सोनार काम , कारागिरी काम , वेगवेगळ्या डिझाईन बनवणे जर महिलांनी केले तर या व्यवसायातून आर्थिक प्राप्ती होऊ शकते . तसेच महिलांना मग स्वावलंबी जीवन जगता येईल..
चला तर मग.. आपल्या या  व्यवसायाला आणखीन पुढे नेण्यासाठी महिलांना प्रवृत्त करुन सोनारकामाची सुवर्णकारात परंपरा कायम ठेवु या...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा