Subscribe Us

header ads

गेवराई ; अवैधरित्या वाळू घेऊन निघालेल्या भरधाव ट्रँक्टरच्या धडकेत एका जणाचा जागीच मृत्यू; प्रेत ताब्यात घेण्यास ग्रामस्थांचा नकार

बीड स्पीड न्यूज 

गेवराई_अवैधरित्या वाळू घेऊन निघालेल्या भरधाव ट्रँक्टरने चिरडल्याने एका जणाचा जागीच मृत्यू झाला. हि घटना गेवराई तालुक्यातील खामगाव येथे आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास राक्षसभुवन फाट्यावर घडली आहे. दरम्यान या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले असून जोपर्यंत ठोस कारवाई केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. पाच तासापासून येथील उपजिल्हा रुग्णालयात ग्रामस्थांनी ठिय्या मांडला असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.गेवराई तालुक्यातील खामगाव येथील तुकाराम निंबाळकर हे आपल्या दुचाकीवरुन (एम.एच.23ए.ए.8126) गेवराईकडे येत असतांना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये निंबाळकर यांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली होती. तर घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. ग्रामस्थांनी महामार्गावरच ठिय्या मांडून जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत महामार्गावरुन उठणार नसल्याचा आक्रमक पवित्रा सुरुवातीला घेतला होता. तसेच मृतदेह येथील उपजिल्हा 

रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणल्यानंतर याठिकाणी देखील ग्रामस्थांनी ठिय्या मांडून जोपर्यंत ठोस कारवाई केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने याठिकाणी तणावपूर्ण वातावरण आहे.दुपारी एक वाजल्यापासून येथील उपजिल्हा रुग्णालयात ग्रामस्थांनी ठिय्या मांडला आहे. या ठिय्यामध्ये मनसेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, भाजपचे युवा नेते शिवराज पवार, दादासाहेब गिरी, योगेश मोटे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.अपघातानंतर चालकाने ट्रँक्टरसह पळून गेला होते. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यानंतर सदरील ट्रँक्टर खामगाव येथून ताब्यात घेऊन येथील पोलिस ठाण्यात लावण्यात आले आहे. तर आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा