Subscribe Us

header ads

गोवा, पंजाब, मणिपुर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर;10 फेब्रुवारीपासून मतदान, 10 मार्चला निकाल

बीड स्पीड न्यूज 

नवी दिल्ली, 08 जानेवारी_ देशभरात कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यामुळे सर्वत्र निर्बंध कडक करण्यात आले आहे. अशातच पाच राज्यात निवडणुका घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. एकूण 7 टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. 10 मार्चला मतमोजणी होणार आहे.मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. कोरोनाच्या काळात निवडणूक घेणे हे आव्हानात्मक आहे. पण निवडणूक घेणे हे आमचे कर्तव्य आहे. 'यकीन हो तो कोई भी रास्ता निकलता है, हवा की ओट लेकर भी चिराग जलता है
' अशी शायरी करत सुशील चंद्रा यांनी कोरोनाच्या संकटात निवडणुका घेण्याबद्दल भूमिका स्पष्ट केली.तसंच, कोरोनाचे संकट पाहता 15 जानेवारीपर्यंत रॅली, पदयात्रा, रोड शो, सायकल, बाइक रॅली काढण्यास मनाई करण्यात आली आहे. राजकीय पक्षांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या मदतीने सभा घ्याव्यात, असं आवाहनही चंद्रा यांनी केलं.यावेळी पाच राज्यांमध्ये एकूण 18 कोटी नवे मतदार हे मतदान करणार आहे. आचार संहितेचं उल्लंघन केल्यास तक्रार करण्यासाठी see vigil  हे अॅप तयार करण्यात आले आहे. यावर फोटो आणि व्हिडीओ अपलोड करण्याची सुविधा आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर 100 मिनिटांच्या आत कारवाई करण्यात येईल, असंही चंद्रा यांनी सांगितलं.गोवा, पंजाब, मणिपुर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.  7 टप्प्यात ही निवडणूक पार पडणार आहे. तर पंजाब विधानसभा निवडणूक ही 3 टप्प्यात पार पडण्याची शक्यता आह. तर मणिपुर मध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे.  गोवा आणि उत्तराखंड मध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे.  मार्च-एप्रिल महिन्यात गोवा, पंजाब, मणिपुर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेचा समाप्त होणार आहे. कोरोनाची लाट पाहत योग्य ती खबरदारी घेऊन ही निवडणूक जाहीर झाली आहे.

 सध्या चार राज्यात भाजपचे सरकार आहे

पाच राज्यामध्ये निवडणुका जाहीर झाल्या आहे, त्या पाच राज्यांपैकी चार राज्यात भाजपची सत्ता आहे. उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ हा 14 मे रोजी समाप्त होत आहे.  उत्तर प्रदेश विधानसभेत एकूण 403 जागा आहे. पंजाब विधानसभेचा कार्यकाळ 23 मार्च रोजी समाप्त होणार आहे. उत्तराखंड विधानसभेचा कार्यकाळ 23 मार्च रोजी  समाप्त होणार आहे. उत्तराखंड विधानसभेसाठी 70 जागा आहे. उत्ताराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे. गोवा विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्च रोजी संपणार आहे. गोवा विधानसभेसाठी एकूण 40 जागा आहे. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे. तर मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ 19 मार्च रोजी समाप्त होणार आहे. मणिपूरमध्ये एकूण 60 जागा आहे. एन बीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा