Subscribe Us

header ads

आ.संदिप भैय्यांच्या माध्यमातून 17 कोटी रूपयांच्या विकास कामांना सुरूवात इंन्फंट इंडियाकडे जाणारा रस्ता काम सुरू झाल्याने चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर फुलले हस्य; श्री क्षेत्र कपिलधार रस्त्याचे काम सुरू

बीड स्पीड न्यूज 


आ.संदिप भैय्यांच्या माध्यमातून 17 कोटी रूपयांच्या विकास कामांना सुरूवात
इंन्फंट इंडियाकडे जाणारा रस्ता काम सुरू झाल्याने चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर फुलले हस्य; श्री क्षेत्र कपिलधार रस्त्याचे काम सुरू


बीड (प्रतिनिधी):- गेल्या तीस वर्षाच्या काळात जी विकास कामे झाली नाहीत ती विकास कामे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पुर्णत्वास येत आहेत. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या 

प्रयत्नातून 17 कोटी 28 लक्ष रूपयांच्या विविध विकास कामांचे आज उद्घाटन करण्यात आले. श्री क्षेत्र कपिलधारकडे जाणारा रस्ता व कपिलधारवाडी येथील सिमेंट रस्ता काम सुरू झाल्याने भाविकांना याचा मोठा फायदा होणार आहे. राज्य मार्ग 211 ते इंन्फंट इंडियाकडे 

जाणार्‍या रस्त्याचे काम सुरू झाल्याने येथील चिमुकल्यांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी रस्त्याची जी अडचण होती ती दूर झाल्याने चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर हस्य पहायला मिळाले. आहेर वडगाव, पाली व बार्शी नाका ते इमामपूर नेकनूर रस्त्याचेही उद्घाटन मान्यवरांच्या 

हस्ते करण्यात आले.आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून रविवार दि.30 जानेवारी रोजी 17 कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी वैजीनाथ नाना 

तांदळे, बबन बापु गवते, कल्याण काका आखाडे,डॉ.जोगदंड, महादेव उबाळे, बाळासाहेब गुजर, नंदकुमार कुटे यांच्यासह कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कपिलधार येथील रस्ता झाल्यानंतर भाविकांना याचा मोठा फायदा होणार 

आहे. त्याचबरोबर पाली आणि मोरदरा येथील विकास कामामुळे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचे आभार मानले आहेत. यामध्ये रामा.211 ते कपिलधारवाडी ते कपिलधार मंदिर मांजरसुंबा रस्ता प्रजिमा 35 रूंदीकरण व हॉट मिक्स रस्ता करणे. कपिलधारवाडी गावात 200 मि. लांबीचा सिमेंट रस्ता करणे, रामा 211 ते आनंदग्राम इंन्फंट इंडिया सोसायटी रोड करणे ता.बीड, रामा 211 ते पालदरा रस्ता सुधारणा करणे, रामा 211 ते आहेरवडगाव-गाडेवस्ती रस्ता सुधारणा करणे, प्ररामा 16 बीड-इमामपुर-नेकनूर-अंबीलवडगाव-पोथरा-चांदणी-पालसिंगण इजिमा 43 ते रामा 64 रस्ता प्रजिमा 74 कि.मी.0/00 ते 37/00 मध्ये सुधारणा करणे या रस्ता कामाचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा