Subscribe Us

header ads

सारडगाव येथे दिव्यांग मनोज गायकवाड यांचे दुकान आगीत भस्मसात ; डॉ. संतोष मुंडे यांची घटनास्थळी भेट ; दिव्यांग कुटुंबाला दिला आधार

बीड स्पीड न्यूज 


सारडगाव येथे दिव्यांग मनोज गायकवाड यांचे दुकान आगीत भस्मसात ; डॉ. संतोष मुंडे यांची घटनास्थळी भेट ; दिव्यांग कुटुंबाला दिला आधार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मौजे सारडगाव येथे दिव्यांग बांधव यांचे मनोज राजेंद्र गायकवाड यांच्या किराणा व जनरल स्टोअर्सला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान आगीत भस्मसात झाले. दिव्यांग बांधवांचा आधार असलेल्या कुटुंबाचे दुकान  संपूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले व अंदाजे 2 

लाख रूपयांचे मोठे नुकसान झाले. ही माहिती समजताच दिव्यांगाचे कैवारी डॉ. संतोष मुंडे यांनी आज रविवार, दि.30 जानेवारी रोजी तातडीने घटनास्थळी प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी केली. तसेच तलाठी यांच्या मार्फत पंचनामा करून घेतले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली  दिव्यांग विकास महामंडळाच्या वतीने लवकरच दिव्यांग बांधवांस मदत दिली जाणार आहे. असे डॉ.संतोष मुंडे यांनी सांगितले. तसेच दिव्यांग कुटुंबाला आधार दिला. सारडगाव येथे दिव्यांग मनोज राजेंद्र गायकवाड यांचे अचानक 

लागलेल्या आगीत किराणा व जनरल स्टोअर्स आगीत भस्मसात झाले. दिव्यांग बांधव मनोज गायकवाड यांचे किराणा व जनरल सटोअर्स या दुकानाचे अंदाजे दोन लाख रुपये पेक्षा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामध्ये दुकानातील ,सर्व भरलेला माल व फर्निचरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दिव्यांगाचे कैवारी डॉ. संतोष मुंडे यांनी सारडगाव येथे जाऊन नुकसानग्रस्त दुकानाची पाहणी केली. दिव्यांग बांधव मनोज गायकवाड यांना धीर दिला. तसेच डॉ. संतोष मुंडे यांनी तातडीने तलाठी यांच्या मार्फत तात्काळ पंचनामा करून घेतला तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग विकास 

महामंडळाच्या वतीने लवकरच दिव्यांग बांधवांस मदत दिली जाणार आहे. असे डॉ.संतोष मुंडे यांनी सांगितले. तसेच दिव्यांग कुटुंबाला आधार दिला. यावेळी डॉ. संतोष मुंडे यांच्यासह युवा नेते संजय आघाव,ज्ञानेश्वर मुंडे, संजय तांदळे, रामभाऊ बोबडे, राहुल आघाव, भगवान आंधळे, अनंत गायकवाड, दिलीप तांदळे, राम बोबडे,  भानुदास तांदळे, दगडू अघाव,दिलीप गायकवाड,मनोज गायकवाड,आमोल गोलेर, आश्रुबा गवळी,रजेभाऊ सतभाई,दगडू अघाव,दिलीप गायकवाड,मनोज गायकवाड,आमोल गोलेर, आश्रुबा गवळी,रजेभाऊ सतभाई व इतर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा