Subscribe Us

header ads

औरंगाबादच्या पाटलाची महाराष्ट्रात चर्चा, निवडणूक लढवण्यासाठी ‘उमेदवार बायको पाहिजे,’ शहरभर लावले बॅनर

बीड स्पीड न्यूज 

औरंगाबाद_राज्यात सध्या वेगवगळ्या निवडणुका सुरु आहेत. जिल्हा बँक, महापालिकेच्या निवडणुकांमुळे वातावरण तापललेले आहे. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षातील उमेदवार आपापल्या परीने जिंकण्यासाठी शक्कल लढवित आहेत. काहीही झालं तरी निवडणूक जिंकायचीच असा निश्चय अनेकांनी मनाशी बांधला आहे. सध्या मात्र औरंगाबाद पालिका निवडणूक लढण्याची इच्छा बाळगणाऱ्या एका  पाटीलची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा  आहे. त्याला निवडणूक लढवायची इच्छा होती. मात्र लॉकडाऊनमध्ये तिसरे आपत्य झाल्यामुळे तो निवडणुकीसाठी उभा राहू शकत नाहीये. याच तरुणाने चक्क निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे असे लिहलेले बॅनर संपूर्ण शहरभर लावले आहे. तरुणाच्या या बॅनरची सध्या महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. रेमश विनायकराव पाटील असे तरुणाचे नाव आहे.

 शहरभर लावले ‘बायको पाहिजे’चे बॅनर

औरंगाबादेतील तरुण रमेश विनायकराव पाटील यांना लॉकडाऊनमध्ये तिसरे अपत्य झाल्या. तीन अपत्य झाल्यामुळे त्यांना मनपा निवडणूक लढता येणार नाही. मात्र त्यांना निवडणूक लढवण्याची खूप इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी थेट शहरभर बायको पाहिजे असे लिहलेले बॅनर लावले आहे. या बॅनरसोबत त्यांनी बायको कशी असवी हेसुद्धा लिहले आहे. पाटील यांचा प्लॉटिंग चा व्यवसाय आहे. त्यांच्या याच बॅनरची सगळीकडे चर्चा होत आहे.


उमेदवार बायको पाहिजे, बायको कशी असावी ?

रमेश पाटील यांनी लिहलेले बॅनर अतिशय मजेदार आहे. त्यांनी बॅनरवर पत्नीचे वय तसे च ती कशी असावी याविषयी सविस्तर लिहले आहे. मला तीन मुले असल्यामुळे मी निवडणूक लढवू शकत नाहीये. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी मला उमेदवार बायको पाहिजे. जातीची अट नाहीये. मुलीचे वय 25 ते 40 वर्षादरम्यान असावे. विधवा तसेच घटस्फोटीत मुलगीदेखील चालेल. लग्नासाठी उत्सुक असलेल्या मुलीला दोनपेक्षा जास्त अपत्य नसावे,’ असे पाटील यांनी त्यांच्या बॅनरमध्ये लिहले आहे. तशा अटी त्यांनी सांगितल्या आहेत. सध्या या बॅनरची औरंगाबाद मध्ये खूपच  चर्चा आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा