Subscribe Us

header ads

सहाय्यक प्रा.पायल राठोड यांचा सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल तुलसी समूहाकडून सत्कार

बीड स्पीड न्यूज 


सहाय्यक प्रा.पायल राठोड यांचा सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल तुलसी समूहाकडून  सत्कार


बीड(प्रतिनिधी):- तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, बीड येथील प्रा.पायल विनोद राठोड या सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्याबद्दल देवगिरी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे यांनी सहाय्यक.प्रा.राठोड यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी प्राचार्य अश्विनी बेद्रे,प्राचार्य उमा जगतकर,प्राचार्य डि.जी.निकाळजे यांची उपस्थिती होती.
प्रा.पायल राठोड या तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन,बीड येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी २६ सप्टेंबर २०२१ रोजी 'होम सायन्स' या विषयात सेट परीक्षा दिली होती. सहाय्यक प्रा.पायल राठोड यांनी एम.एस.सी होम सायन्स मधून मास्टर डिग्री पूर्ण केली आहे. त्यांनी पहिल्या प्रयत्नात  यूजीसी एम.एच.सी.इ.टी उत्तीर्ण केली आहे. त्यांना डिरेक्टर ऑफ गव्हर्नमेंट विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड ह्युमॅनिटी चे अध्यक्ष डॉ अंजली देशमुख,तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाइन च्या प्राचार्य अश्विनी बेद्रे,गव्हर्मेंट विदर्भ इन्स्टिट्यूट सायन्स अँड ह्युमॅनिटी चे सहाय्यक प्रा.रीना बोराडे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्यांचा तुलसी समूहाकडून यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी प्राचार्या अश्विनी बेद्रे, प्राचार्य उमा जगतकर यांनी सहाय्यक प्रा.पायल राठोड यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी तुलसी समूहातील सर्व प्राध्यापक,कर्मचारी यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा