Subscribe Us

header ads

आ. संदीप क्षीरसागरांच्या उपस्थितीत आज सचिन दुधाळ यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

बीड स्पीड न्यूज 


आ. संदीप क्षीरसागरांच्या उपस्थितीत आज सचिन दुधाळ यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

बीड (प्रतिनिधी):- बीड विधानसभा मतदार संघाचे आमदार संदीपभैय्या क्षीरसागर यांच्या उपस्थितीत प्रभाग क्र.2 भागातील युवा कार्यकर्ते सचिन दुधाळ यांचा आज सायंकाळी 7 वाजता जिजामाता चौक, मोंढा रोड बीड येथे एका भव्य कार्यक्रमात जाहीर प्रवेश होणार आहे. यावेळी आ.संदीप क्षीरसागर, मा.आ.प्रा.सुनीलदादा धांडे, मा.आ.सय्यद सलीम, सावता परिषदेचे संस्थापक कल्याणकाका आखाडे, डॉ.जोगदंड, जावेद कुरेशी, सरपंच बाजीराव बोबडे, दिलीप खांडे यांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे.शहरातील जिजामाता चौक, माळीवेस, सावता माळी चौक परिसरात रहाणार्‍या नागरीकांच्या सुख-दु:खात सहभागी होणारे आणि प्रत्येकाच्या अडीअडचणीला हजर रहाणारे या भागातील युवा कार्यकर्ते सचिन दुधाळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार अशी चर्चा होती. आता या चर्चेला पुर्णविराम मिळत असून आज रविवार दि.30 जानेवारी 2022 रोजी सायं. 7 वाजता त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत आणि जिजामाता चौकात होणार्‍या भव्य कार्यक्रमात जाहीर प्रवेश होणार आहे. यावेळी आ.संदीप क्षीरसागर समर्थक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तरूण कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहेत. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणार्‍या आणि आ. संदीप क्षीरसागर यांच्यावर प्रेम करणार्‍या नागरीकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा