Subscribe Us

header ads

अपशब्द जिव्हारी लागल्याने अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

बीड स्पीड न्यूज 

अपशब्द जिव्हारी लागल्याने अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

केज_ उसने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी अल्पवयीन मुलास त्याची आई बद्दल अपशब्द वापरत मारहाण केली. अपशब्द जिव्हारी लागल्याने दुखावलेल्या त्या मुलाने बाथरूममध्ये जाऊन शर्टाने गळफास घेतला. केज तालुक्यातील बनकारंजा येथील सदरील घटनेत दोघा जणांवर  गुन्हा दाखल करण्यात आला.विक्रम वसंत लांब (वय १७, रा. बनकारंजा, ता. केज) असे त्या मयत मुलाचे नाव आहे. विक्रमच्या वडिलांचे कुंबेफळ शिवारात हॉटेल आहे. रविवारी (दि.०९) सायंकाळी ५ वा.त्याचे वडील पाणबुडी मोटर बसवण्यासाठी शेतात गेल्याने विक्रम हॉटेल सांभाळत होता. यावेळी गावातील बळीराम नानासाहेब लांब (नागरगोजे) व सुभाष नवनाव लांब ( नागरगोजे) हे दोघे हॉटेलवर आले. त्यांनी विक्रमकडे दोन हजार रुपये उसने देण्याची मागणी केली. परंतु, जवळ पैसे नसल्याने विक्रमने त्यांना नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या त्या दोघांनी विक्रमजवळ आई बद्दल अपशब्द वापरले आणि त्याला चापटाबुक्याने मारहाण केली. वडील शेतातून आल्यानंतर विक्रमने रडत रडत त्यांना घडलेली घटना सांगितली. वडिलांनी त्याला समजावून शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु अपशब्द जिहारी लागल्याने विक्रम शांत होत नव्हता. त्यानंतर घरी असताना रात्री ९ वाजता विक्रमने बाथरूममध्ये जाऊन खिडकीला अंगावरील शर्टाच्या साह्याने गळफास घेतला. बराच वेळ झाला तरी विक्रम बाहेर येत नसल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडला असता त्यांना हा प्रकार दिसून आला त्यांनी तातडीने विक्रमला रुग्णालयात दाखल केले असता तिथे डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले. याप्रकरणी वसंत लांब यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींवर युसुफवडगाव पोलीस ठाण्यात कलम ३०५, ३२३, ३४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा