Subscribe Us

header ads

गाडीची काच फोडून सात लाख रुपयांची बॅग आज्ञात चोरट्यांनी पळवली

बीड स्पीड न्यूज 

गेवराई_शहरातील सेवालाल नगर भागात एका स्विफ्ट गाडीत ठेवलेली सात लाख रुपयांची बॅग आज्ञात चोरट्यांनी गाडीची काच फोडून पळवली. हि घटना आज दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने गेवराई शहरात एकच खळबळ उडाली आहे.गेवराई शहरातील सेवालाल नगर भागात रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने आपल्या स्विफ्ट डिझायर MH 23 BC 9977 या कारमध्ये  एका बॅग मध्ये सात लाख रुपये ठेवली होती. दरम्यान सदरील बॅग अज्ञात चोरट्याने गाडीची काच फोडून पळवली. हा प्रकार दिवसा ढवळ्या घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर गेवराई पोलिसांनी धाव घेतली. याठिकाणी पोलिसांनी पाहणी करून श्वानपथकास पाचारण केले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया गेवराई पोलिस ठाण्यात सुरू होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा