Subscribe Us

header ads

उमरीत राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी

बीड स्पीड न्यूज 

उमरी तालुका प्रतिनीधी प्रकाश कारलेकर

उमरीत राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी


उमरी प्रतिनिधी -:शहरात राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.शिरिषभाऊ देशमुख गोरठेकर यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेची पुजा, पुष्पहार घालून अभिवादन केले.जयंतीनिमित्त आलेले सर्व शिवप्रेमींनी राजमाता जिजाऊ प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी पं.स.उपसभापती शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर यांनी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव निमित्त साधून त्याच्या वाणीतुन संबोधीत केल की,१२ जानेवारी इ.स‌.१५९८ राजमाता_जिजाऊ_जन्मोत्सव १२ जानेवारी या दिवशी महाराष्ट्राच्या इतिहासाला एक कलाटणी मिळाली होती. स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी जिजाऊ रूपाने सिंदखेड राजा येथे लखुजीराजे जाधवांच्या घरी प्रकटली,हीच ती स्वराज्य-जननी, हीच ती माता जिने स्वराज्याचे देखणे स्वप्न देखिले, हीच ती जननी जिने आमच्या रक्ता रक्ता मध्ये स्वाभिमान भिनवला. जिने 'प्रत्येक' मावळ्या मध्ये शिवबा घडवला. स्वराज्या साठी लढणाऱ्या प्रत्येकावर आगदी शिवबा प्रमाणेच प्रेम केले. जिजाऊ साहेबांनी आपल्या मायेने शिवबांसाठी जीवाला जीव देणारे मावळे घडवले, स्वाभिमानाच्या ठिणगीने त्यांना पेटवले आणि पुढे हीच स्वराज्याची मशाल क्रूर यवनांना जाळून खाक करू लागली.आमच्या ह्याच शूर मावळ्यांना स्वप्नात पण बघून हेच जुलमी दुश्मन झोपेत पण दचकून जागी व्हायचे. ह्या सर्वांना एकत्र ठेवणारा तो शिवबा ह्याच माउलीने घडविला.या माउलीने आपले उभे आयुष्य या स्वराज्याच्या जडण घडणीसाठी पणाला लावले. आपले सौभाग्य आणि आपल्या पोटचा गोळा देखील या स्वराज्याला ओवाळून टाकीला. एक पत्नी म्हणून धीराने शहाजी राजांच्या सोबत उभ्या राहिल्या. शिवरायांच्या मातृत्वा बरोबरच त्यांचे गुरुत्व हि त्यांनी स्वीकारले; प्रसंगी याच माउलीने हाती तलवारही धरली. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषेची जान तेंव्हा सर्वांना झाली आणि अखेर कित्येक वर्षाच्या संघर्षा नंतर ३२ मन सोन्याचे सिंहासन रायगडी अवतरले.स्वराज्य मिळाले आणि त्या स्वराज्याला छत्रपती मिळाला. जिजाऊच्या नव्हे तर कुणाच्या आशीर्वादाने ,,,राजमाता जिजाऊ जन्मोत्सव निमित्त मानाचा मुजरा,,जन्मोत्सव निमित्त अनेक मान्यवरांचे भाषणे झाली.यावेळी,उमरी पंचायत समिती उपसभापती शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर, मा.नगराध्यक्ष प्रविणभाऊ सारडा,जिल्हाउपाध्यक्ष राॅ.काॅ.पांडुरंग देशमुख गोरठेकर, जि.प.सदस्य आनंदराव यलमगोंडे,उद्योजक संदिप पाटील कवळे,भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकरराव देशमुख धानोरकर,डाॅ.विभूते साहेब, पोलीस निरीक्षक मोहन भोसले सर मा.नगराध्यक्ष सुभाष पेरेवार,युवा जिल्हाध्यक्ष छावा क्रांतीविर सेना बालाजी पाटील ढगे,जि.प.सदस्य बालाजीराव जाधव दै.लोकमत प्रतिनीधी चव्हाण साहेब,दै.पुढारी प्रतिनीधी लक्ष्मीकांत देशमुख,युवा जिल्हाउपाध्यक्ष छावा क्रांतीविर सेना विलास लोहगावे,राजेश पाटील जाधव छावा तालुकाध्यक्ष यांच्यासह तालुक्यातील अनेक जण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा