Subscribe Us

header ads

देऊळगावराजा येथे अखंड हरिनाम व भागवत कथा सप्ताह संपन्न

बीड स्पीड न्यूज 

(वृत्तसंकलनःपत्रकार आत्माराम ढेकळे,पुणे )


देऊळगावराजा येथे अखंड हरिनाम व भागवत कथा सप्ताह संपन्न


पुणेः    वै.ह.भ.प.कचरुलाल टेंभुरकर यांच्या ११ व्या पुण्यतिथी निमित्त  देऊळगावराजा येथे "अखंड हरिनाम व भागवत कथा सप्ताह " टेंभुरकर परिवारांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.विविध धार्मिक ,अध्यात्मिक दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करुन काल्याच्या किर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली.बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथे बालाजी मंदिराजवळ शनिमंदिर परिसरात दि.३ ते ९ जानेवारी २०२२ पर्यंत या "अखंड हरिनाम व भागवत कथा सप्ताह" चे आयोजन वै.ह.भ.प.कचरुलाल गोपीनाथ टेंभुरकर यांच्या ११ व्या पुण्यस्मरण निमित्त करण्यात आले होते.सप्ताहात दैनंदिन कार्यक्रमात सकाळ ते संध्याकाळ  गाथा 

भजन,भागवतकथा,प्रवचन,हरिपाठ व रात्री हरिकिर्तनाचा समावेश होता.यामध्ये ह.भ.प.प्रकाश महाराज,ह.भ.प.नाना महाराज पोखरीकर,ह.भ.प.अनिरुध्द महाराज ,ह.भ.प.भिकाजी महाराज ,ह.भ.प.संतचरणदास निकम गुरुजी,ह.भ.प.नाना महाराज बाप्पा यांनी प्रबोधनपर किर्तनसेवा दिली.प्रामुख्याने भागवताचार्य रमाकांतदेव महाराज यांनी सुमधुर वाणी व संगीतमय भागवत कथा पठण केली.प.पू.सदगुरु संत भगवानबाबा आनंदगडकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. कोरोना प्रार्दुभाव असल्यामुळे भाविक भक्तांची अतिशय कमी उपस्थिती होती.कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन करुन हा सप्ताह संपन्न झाला.  या सप्ताहाचे आयोजन चंद्रकांत टेंभुरकर व टेंभुरकर परिवारांच्या वतीने करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा