Subscribe Us

header ads

मौ.मोखंडी येथील मागासवर्गीयांच्या स्मशानभूमीचा प्रलंबित प्रश्न तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी कायमस्वरूपी मिटविला!!

बीड स्पीड न्यूज 

उमरी तालुका प्रतिनीधी प्रकाश कारलेकर

मौ.मोखंडी येथील मागासवर्गीयांच्या स्मशानभूमीचा प्रलंबित प्रश्न तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी कायमस्वरूपी मिटविला!!



उमरी प्रतिनिधी_उमरी तालुक्यातील मौ.मोखंडी येथील अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न असलेल्या मागासवर्गीयांच्या स्मशानभूमीवरील अतिक्रमण तहसीलदार माधवराव बोथीकर साहेब यांनी गेल्या काही दिवसापूर्वीच हटवले, त्यांनी स्मशानभूमीचा वाद कायमस्वरूपी मिटविला आहे. त्यामुळे 29 डिसेंबर रोजी नविन स्मशानभूमीत मृतदेहावर पहिला अंत्यविधी करण्यात आला. तालुक्यातील मोखंडी येथील गायरान गट क्रमांक 102 वरील 82 आर जमीन मागासवर्गीयांच्या स्मशानभूमीसाठी ठेवण्यात आली आहे.तसा सातबारा असून या स्मशानभूमीच्या 20 गुंठे जमिनीवरही 103 चा मालक महाजन लक्ष्मण सुर्यवंशी हा ताबा करून होता.या संदर्भात गावात अनेक वेळा वाद विवाद झाले. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थीती बिघडण्याचे प्रकार अनेक वेळा घडले.या प्रकरणी उमरी तहसीलचे तहसीलदार माधवराव बोथीकर साहेब यांनी वैयक्तिक लक्ष घालून उमरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले ,पंचायत समिती,भुमिअभिलेख अधिकारी, कर्मचाऱ्यांना घेऊन तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांना सोबत घेऊन समज देऊन अतिक्रमण झालेली व स्मशानभूमीची जागा भुमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून मोजून घेतली. यावेळी स्मशानभूमीच्या जमिनीचा कब्जा घेऊन मोजणी नंतर पोलीस बंदोबस्तात 20 गुंठे जमीन अतिक्रमणातुन मुक्त केली आहे.या स्मशानभूमीसाठी 23 नोव्हेंबर 2021 रोजी जमिनीचा ताबा ग्रामसेवकाकडे देण्यात आला.तसेच स्मशानभूमीच्या अंतर्गत पुर्ण नाली खोदून कायम हद्द पाडून देण्यात आली आहे.हद्द पाडून देताना तहसीलदार माधवराव बोथीकर, नायब तहसीलदार गिरिष सर्कलवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे,सरपंच उत्तम जाधव मोखंडीकर, उपसरपंच यशवंत क्षीरसागर, ग्रामसेवीका राठोड मॅडम, मंडळ अधिकारी बेंद्रीकर, तलाठी शिंदे, गायकवाड, राऊत, सोनार,शेख मोईज, तोटावाड राठोड, शेख रईस, पंचायत समिती विस्तार अधिकारी काकडे, मुंडकर, जगदंबे, भुमिअभिलेखचे रमेश चंद्रवंशी यांच्या उपस्थितीत हद्द कायम करून देण्यात आली आहे.अखेर मोखंडी येथील मागासवर्गीयांच्या स्मशानभूमीच्या जागेचा तिढा कायम सुटला असून गायरान च्या नवीन जागेत बुधवारी दि.29 डिसेंबर रोजी पहिला अंत्यविधीही करण्यात आल्याची माहिती उमरी तहसील चे तहसीलदार माधवराव बोथीकर साहेब यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा