Subscribe Us

header ads

बशीरगंज ते तेरवी लाईन पर्यंत गुत्तेदाराने निर्माण केले अपघात स्थळ !अनावश्यक व अर्धवट गतिरोधक काढा अन्यथा आंदोलन - एस.एम.युसूफ़

बीड स्पीड न्यूज 

बशीरगंज ते तेरवी लाईन पर्यंत गुत्तेदाराने निर्माण केले अपघात स्थळ !अनावश्यक व अर्धवट गतिरोधक  काढा अन्यथा आंदोलन - एस.एम.युसूफ़


बीड (प्रतिनिधी) - बशीरगंज ते तेरवी लाईन पर्यंत गुत्तेदाराने अनावश्यक व अर्धवट गतिरोधक टाकून अपघात स्थळ निर्माण केल्याचे नमूद करत या रस्त्यावरील गतिरोधक काढून टाका अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिला आहे.याविषयी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, बशीरगंज ते गणेश नगर कॉर्नर पर्यंत चे पेवर ब्लॉक (सिमेंट गट्टू) काढून काँक्रिटीकरण करणाऱ्या गुत्तेदाराने अनेक जागी उंच व अर्धवट गतिरोधक टाकून ठेवले आहे. ते वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहने सर्रासपणे  राँग साईडने चालविली जात आहेत. एका जागी तर विद्युत डी.पी. असलेल्या रेषेत अर्धवट गतिरोधक टाकले आहे. मात्र यामुळे वाहन चालक गतिरोधक नसलेल्या  भागाकडून डी.पी. ला चिटकून वाहने चालवित आहेत. रस्त्यावर डी.पी. पासून जेमतेम सात-आठ फूट रुंद गतिरोधक विना सोडलेल्या रस्त्यावरून गतिरोधक वाचविण्यासाठी या रस्त्यावर दोन्ही बाजूने येणारी वाहने गतिरोधक टाकलेला रुंद रस्ता सोडून गतिरोधक विना असलेला सात-आठ फूट रुंद रस्त्यावरून विद्युत डी.पी.ला चिटकून वाहने चालवित आहे. यामुळे समोरा-समोर वाहन धडकून विद्युत डी.पी.वर वाहन चालक पडले तर एखाद्याचा जीव जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच भानुदास वडमारे व राजेंद्र जोगदंड यांच्या घरांच्या मध्यभागी अर्ध्या रस्त्यावर गतिरोधक टाकण्यात आले आहे. अर्धा रस्ता गतिरोधक विना आहे. यामुळे येथेही दुचाकी, तीनचाकी व चार चाकी वाहने राँग साईडने ये-जा करत आहे. येथेही समोरा-समोर धडक होऊन अपघात घडू शकतात. शिवाय न्यू सुंदर मेडिकल ते नगरसेवक अक्रम बागवान यांच्या घराकडे जाणार्‍या गल्लीच्या कॉर्नर पर्यंत ही एक चुकीच्या जागी अनावश्यक असा उंचच-उंच गतिरोधक टाकलेला आहे. या गतिरोधकामुळे येथे वाहने बंद पडत आहेत. चालती वाहने अचानक बंद पडल्याने  मागून येणारी वाहने समोरच्या बंद पडलेल्या वाहनाला धडकत आहेत. यामुळे येथे सुद्धा मोठा अपघात होऊ शकतो. मात्र यासर्व बाबींकडे बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासह नगराध्यक्ष, या प्रभागातील नगरसेवक, नगरपरिषदेचे अभियंते यांचे दुर्लक्ष असून बशीरगंज ते तेरवी लाइन कॉर्नर पर्यंतच्या रस्त्यावर अनावश्यक उंच गतिरोधक व अर्धवट गतिरोधकांमुळे येत्या काही दिवसात मोठा व भीषण अपघात घडून जीवित व वित्त हानी झाली होऊ शकते. असे घडल्यास या रस्त्यावरील सिमेंट गट्टू काढून काँक्रिटीकरण करताना टाकण्यात आलेल्या अनावश्यक व चुकीच्या पद्धतीचे गतिरोधक टाकणाऱ्या गुत्तेदारासह वर उल्लेख केलेले बीड नगर परिषदेतील सर्व अधिकारी, पदाधिकारी जबाबदार राहतील व त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी पत्रकातून दिला असून या आंदोलनात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर, डॉ. संजय तांदळे, शेख युनूस चर्‍हाटकर, संदीप जाधव, सय्यद इलयास, मुहम्मद मोईजोद्दीन, सय्यद आबेद, शेख मुबीन आदी सहभागी राहतील असे नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा