Subscribe Us

header ads

भामट्यांच्या सांगण्यावरून ‘एनी डेस्क’ ॲप डाउनलोड केले, दोघांनी पावणेदोन लाख रुपये गमावले

बीड स्पीड न्यूज 


भामट्यांच्या सांगण्यावरून ‘एनी डेस्क’ ॲप डाउनलोड केले, दोघांनी पावणेदोन लाख रुपये गमावले

बीड_एनी डेस्क’ ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना गंडा घालण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच असून आणखी दोन घटना उघडकीस आल्या आहेत. २१ जानेवारी रोजी गणेश हरिभाऊ जाधव (रा.साळिंबा, ता.वडवणी) या तरुणाला बजाज फायनान्सच्या ईएमआय कार्डची ऑफर असल्याच्या बहाण्याने विपीन गुप्ता नामक भामट्याचा कॉल आला. त्याने गणेशला विश्वासात घेऊन ‘एनी डेस्क’ ॲप डाउनलोड करावयास लावले. त्यानंतर गणेशला बोलण्यात गुंतवून त्याच्या खात्यातून ११ टप्प्यात एकूण १ लाख १० हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी वडवणी ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.दुसरी फसवणुकीची घटना बीड शहरातील शिक्षिका अनिता संतराम तांदळे यांच्या बाबतीत घडली. अनिता तांदळे यांनी गुगल पे ची लिमिट वाढविण्यासाठी गुगलवरून एसबीआय कस्टमर केअरचा चुकीचा नंबर घेतला. त्यावर कॉल करताच समोरून बोलणाऱ्या भामट्याच्या सांगण्यावरून त्यांनी ‘एनी डेस्क’ ॲप डाउनलोड केले. त्यानंतर ‘एनी डेस्क’ ॲपच्या माध्यमातून तांदळे यांच्या मोबाईलचा ताबा घेत भामट्याने त्यांच्या खात्यातून दोन टप्प्यात एकूण ७४ हजार ६७१ रुपये लंपास केले. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता नागरिकांनी शेअरिंग ॲप डाउनलोड करताना काळजी घेणे गरजेचे आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा