Subscribe Us

header ads

बीड खून प्रकरणातील दोघांना जामखेड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बीड स्पीड न्यूज 

जामखेड_ जामखेड पोलिस दलाचे गुन्हा शोध पथक गेल्या तीन दिवसांपासून कमालीचे ऍक्शन मोडवर आहे. सलग तिसऱ्या दिवशी आणखी एका खून प्रकरणातील दोघा आरोपींना जामखेडमध्ये बेड्या ठोकण्याची धडाकेबाज कारवाई करत हॅट्रिक मारली. तिसरी कारवाई करत तीन दिवसांपुर्वी घडलेल्या खुन प्रकरणातील आरोपींना बेड्या ठोकले आहे. या कारवाईमुळे जामखेडला आसरा घेणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका खून प्रकरणातील आरोपी अटक करून चोवीस तास उलट नाही तोच ओरिसा राज्यातील सुलेपट पोलिस स्टेशनच्या हद्दीत एकाचा खून करून सन २०१८ पासून परागंदा असलेल्या जामखेडमधील एका आरोपीला बेड्या ठोकण्याची कामगिरी जामखेड पोलिसांनी कालच पार पाडली होती. ओरिसा राज्यातून खून करून पळालेल्या खुन्यास जामखेडमध्ये गरप २४, २०२२ त्यानंतर सलग तिसऱ्यादिवशी गुन्हा शोध पथकाने आणखी एका खून प्रकरणाचा उलगडा करत दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या. बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस स्टेशन अंतर्गत दाखल खुन प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही खूनाची घटना तीनच दिवसांपुर्वी बीडमध्ये घडली होती. हॉटेलमधील बील देण्याच्या कारणावरून बीड येथे एकाचा खुन करणाऱ्या गुन्ह्यातील २ संशयित आरोपी जामखेड शहरातील मिलिंदनगर येथे आले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने २४ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास धडक कारवाई करत दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. दोघांकडे पोलिस पथकाने सखोल चौकशी केली असता त्यांनी आपली नावे आदेश भगवान जोगदंड (वय २० वर्षे रा. जायकवाडी कॉलनी, नगर रोड, बीड) (प्रथमेश तुकाराम घुले वय २२ वर्षे, रा. अंकुश नगर, नगर रोड, बीड,) असे असल्याचे सांगितले. त्यांना जामखेड पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी किशोर नंदलाल गुरखूदे रा.जव्हेरी गल्ली, बीड यास लोखंडी रॉडने मारहान केल्याचे सांगितले त्यानंतर तो उपचार घेत असताना मयत झाला होता. आम्हीच सदर गुन्हा केला असल्याची कबुली त्यांनी. आरोपी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात सदर गुन्हयाबाबत खात्री केली असता शिवाजी नगर, बीड पोलीस ठाणे येथे गु र नं- ३६ / २०२२ भादवी कलम ३०२,३०७,५०४, ५०६, ३४ प्रमाणे २१ जानेवारी रोजी गुन्हा दाखल होता. अवघ्या तीन दिवसापुर्वी बीड शहरात घडलेल्या खुन प्रकरणाचा जामखेड पोलिसांनी उलगडा केला. दोघा आरोपींना बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पाथरकर यांच्या ताब्यात देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा