Subscribe Us

header ads

पो.नि. गजानन भातलवंडे यांना प्रशंसनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहिर

बीड स्पीड न्यूज 


लातूरचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांना प्रशंसनीय सेवेसाठी  राष्ट्रपती पोलिस पदक जाहिर


बीड प्रतिनिधी | प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पोलीस पदकांची मंगळवारी  घोषणा झाली असुन प्रशंसनीय सेवेकरीता  राज्यातील एकुण ४० पोलिसांना  पोलीस पदक’ जाहीर झाले असुन यात बीड जिल्ह्यात पोलिस निरीक्षक म्हणून उत्कृष्ट  काम केलेले आणि सध्या लातूर  येथील स्थानिक गुन्हा शाखेत पोलिस  निरीक्षक म्हणून काम करणारे गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे यांना पोलिस पदक जाहिर झाले आहे.प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदक’ जाहीर करते. यंदा  राज्यातील एकुण ४० पोलिसांना  पोलिस पदक जाहिर झाले असुन यात लातुर येथील स्थानिक गुन्हा शाखेचे  पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांना राष्ट्रपती  पोलिस पदक जाहिर झाले आहे. सन १९९३ मध्ये पोलिस विभागात पोलिस उपनिरीक्षक म्हणून नियुक्त झालेले भातलवंडे यांनी भंडारा, गोंदियासह मराठवाड्यातील  नांदेड ,बीड, परभणी,येथे पोलिस निरीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनतर लातूर येथील पोलिस प्रशिक्षण विद्यालय बाभळगाव येथे सेवा बजावली आहे. १९९७ मध्ये विशेष सेवापदक मिळाल्यांनतर  सन २००४ मध्ये पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह ,२००९ मध्ये अंतरिक सुरक्षा पदक अशी एकुण तीन पदके त्यांना उत्कृष्ट व प्रशंसनीय सेवेबद्दल मिळालेली आहेत.मागील २८ वर्षापासून  ते पोलिस दलात सेवेत  असुन  संवेदनशील गुन्ह्याची उकल, तपास, दोषसिध्दी त्यांनी केली आहे. उल्लेखनीय कामगिरी बदद्ल आतापर्यंत गजानन भातलवंडे यांना ५३ प्रशंसापत्रे, ४७७ बक्षीसे मिळालेली आहेत. मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला त्यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहिर झाल्याबदद्ल लातूरचे पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधिक्षक अनुराग जैन, सहाय्यक पोलिस अधिक्षक अभयसिंह देशमुख, यांच्यासह पोलिस ,अमंलदारांनी   अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा