Subscribe Us

header ads

स्वातंत्र्यसेनानी हजरत टिपू सुलतान यांच्याबाबतीत सोशल मिडीयावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी महेश धांडे याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

बीड स्पीड न्यूज 

बीड_ स्वातंत्र्यसेनानी हजरत टिपू सुलतान यांच्याबाबतीत सोशल मिडीयावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी बीड शहरातील महेश धांडे याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.हजरत टिपू सुलतान यांच्याबाबतीत रात्री महेश धांडे यांनी फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकली होती. या पोस्टनंतर अनेकांनी याबाबत संताप व्यक्त करत पोस्ट टाकणाऱ्या महेश धांडे विरोधात कारवाई करावी या मागणीसाठी अनेक जण बीड शहर पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून होते. रात्री उशिरा महेश धांडे यांच्या विरोधात 295 (ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास एपीआय ढाकणे हे करत आहेत. दरम्यान वादग्रस्त पोस्ट टाकून समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सदरील धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी घेवून बीड शहरातील अनेक नागरिक शहर ठाण्यामध्ये गेले होते. याची दखल घेत पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी म्हणून तात्काळ महेश धांडे यांच्या विरोधात 295 (ए) नुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान या पोस्टमुळे शहरात काही ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा