Subscribe Us

header ads

सम्यक संबुद्ध विहारात माता रमाई आंबेडकर यांची 124 वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी

बीड स्पीड न्यूज 

सम्यक संबुद्ध विहारात माता रमाई आंबेडकर यांची 124 वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी 

बीड (प्रतिनिधी) 7 फेब्रुवारी अतिशय प्रतिकूल परिस्थितुन माता रमाईनीं मार्ग काढत आपले बालपण व उभी हयात बहुजनांच्या भवितव्यासाठी चंदना सम झिजवत अपार दुःख सोसून अफाट कष्ट सहन करत आपल्या सर्व अशा अपेक्षांचा विचार न करता समाजाच्या परिवर्तना साठी अंनत त्याग केले म्हणूनचं संबंध बहुजनांचे आयुष्य बहरले असून   विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचीत उपेक्षित पददलितांच्या न्याय हक्का साठी मानवतेसाठी स्वाभिमानी लढा उभारला त्या लढतात माता रमाईने डॉ आंबेडकरांनां समर्थ पणे साथ दिली अशा थोर त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची 124 वी जयंती समयक संबुद्ध विहारात मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली या प्रसंगी रिपाई जिल्हा सरचिटणीस राजुजी जोगदंड, भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड, वंचीत चे संदीप जाधव यांनी 

याप्रसंगी आपले मौलिक विचार मांडताना सांगितले कि,डॉ आंबेडकर आपल्या तमाम रंजल्या गांजल्या समाज बांधवांसाठी चळवळीचा भार आपल्या खांद्यावर घेऊन कार्यरत होते तर दुरीकडे माता रमाई डॉ आंबेडकरांच्या संसाराची धुरा व कुटुंबातील सर्वांची काळजी  नित्य पणे वाहत असतं माता रमाईनां डॉ आंबेडकरांच्या समाजाप्रती  असणाऱ्या अमर्यादित जबाबदारीची वा कार्याची  जाणीव होती म्हणून डॉ आंबेडकरानां आपल्या कौटुंबिक दुःख,अडचणीची भनक लागू न देता अनेक संकटानां झुंज देत माता रमाईंनीं मोठया हिमतीने,जिकरीने सर्व जबाबदाऱ्या पेलल्या त्यांच्या त्या अंनत त्यागामुळेचं बहुजनानां डॉ आंबेडकर यांच्या सारखे उद्धारकर्ते लाभले आणि पुढे या देशाला 

सर्वश्रेष्ठ असे संविधान अर्पिले आणि तमाम भारतीयांचा उद्धार झाला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांचे आपल्यावर अगणित उपकार आहेत  याची जाणीव प्रत्येक भारतीयांनीं ठेवली पाहिजे माता रमाई आंबेडकरांचा त्याग संघर्ष आपल्या ह्रदयावर बिंबवला पाहिजे त्यांचा आदर्श आपण आपल्या कृतीतुन अवलंबत समाजिक उतरदायित्व निभावले पाहिजे तेच खरे जयंती निमित्त अभिवादन ठरेल असे मत या ठिकानी मान्यवरांनी व्यक्त केले प्रथमतः महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व महामाता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी  कमलताई जोगदंड, रेखाताई जोगदंड,चंद्रकलाताई जोगदंड,सारीकाताई जोगदंड, जलसा मामी इनकर, शांतबाई वाघमारे, सोजरताई सोनवणे, सविताताई, जोगदंड,nनंदाताई जाधव,
भिंगरेश आबा जोगदंड, बाळासाहेब (जिजा) जोगदंड, राजु राणू जोगदंड, मंगेश जोगदंड, लक्ष्मण जोगदंड, बाळू जोगदंड, गोरख जोगदंड,राजेशभाई कोकाटे, मंगेश जोगदंड,राजू जोगदंड,लक्ष्मण जोगदंड, महादेव वंजारे,अक्षय कोरडे,आदित्य जोगदंड सह आदीं उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्शराजे जोगदंड यांनी केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा