Subscribe Us

header ads

गेवराई दुर्घटनेतील दोषींवर कारवाई करणार, या पाश्वभूमीवर उद्या बैठक

बीड स्पीड न्यूज 

गेवराई दुर्घटनेतील दोषींवर कारवाई करणार, 
या पाश्वभूमीवर उद्या बैठक

बीड, दि.  ७:--जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात शहजानपूर चकला येथे नदीपात्रातील खड्ड्यात बुडून 4 शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अनुषंगाने शासकीय यंत्रणाकडून संबंधित कुटुंबांना दिलासा देण्यासाठी कार्यवाही केली जात आहे, असे जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी सांगितले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सदर घटनेचा तातडीने तपास व चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असून महसूल आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत.  या घटनेला कारणीभूत दोषी असणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल.
राज्य शासनाने आज सार्वजनिक सुट्टी घोषित केली असून भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा पाळला जात आहे. यामुळे गेवराई येथील घटनेबाबत  उद्या बैठक घेण्यात येणार असून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा