Subscribe Us

header ads

अंबाजोगाईत सराफा व्यापाऱ्याच्या लाखोंच्या दागिन्यांसह स्कुटी घेऊन चोरटे पसार

बीड स्पीड न्यूज 


सराफा व्यापाऱ्याच्या लाखोंच्या दागिन्यांसह स्कुटी घेऊन चोरटे पसार

दिवसाढवळ्या चौकात घडलेल्या चोरीमुळे अंबाजोगाईत खळबळ

अंबाजोगाई_ चोरट्यांनी भरदिवसा अंबाजोगाई येथील सराफा व्यापारी राहुल राठोड यांची सोन्याचे दागिने डिकीत ठेवलेली स्कुटी घेऊन पोबारा केल्याची घटना आज सोमवारी (दि.०७) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.सराफा व्यापारी राहुल राठोड यांचे गुरुवार पेठेत सोन्या-चांदीचे दुकान आहे. सूत्रांच्या माहितनुसार, ते रविवारी रात्री दुकान बंद करून गेल्यानंतर चोरट्यांनी शटरच्या कुलुपात फेवीक्विक आणि वाळू टाकली. सोमवारी सकाळी राठोड नेहमीप्रमाणे स्कुटीच्या डिकीत सोन्याचे दागिने घेऊन दुकानाकडे आले. परंतु, कुलूप उघडत नसल्याने ते स्कुटी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चावीवाल्याकडे गेले. यावेळी ते चावीवाल्यासोबत बोलत असताना चोरट्यांनी त्यांची स्कुटी घेऊन पोबारा केला. त्या स्कुटीच्या डिकीत लाखो रुपयांचे दागिने होते. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.दिवसाढवळ्या चौकात घडलेल्या चोरीमुळे अंबाजोगाईत एकच खळबळ उडाली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक