Subscribe Us

header ads

वाळू माफियांनी केलेल्या खड्ड्यात साठलेल्या पाण्यात बुडून चार चिमुकलांचा मृत्यू

बीड स्पीड न्यूज 

गेवराई_वाळू माफियांनी केलेल्या खड्ड्यात साठलेल्या पाण्यात बुडून चार चिमुकलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गेवराई तालुक्यात घडली आहे. अवैध वाळू माफियांनी केलेल्या खड्याने मुलांचा बळी घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून कारवाईची मागणी केली आहे.गेवराई तालुक्यातील शहजाणपूर चकला येथे सायंकाळच्या सुमारास घडली. सिंधफणा नदीकाठावर पोहायला गेलेल्या चार मुलांना खड्ड्याचा अंदाज न आल्याने  बुडून मृत्यू झाला. बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे, आणि अमोल संजय कोळेकर या नऊ ते बारा वर्षे वयाच्या चार बालकांचा खड्यात असलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.गेवराई तालुक्यातील मादळमोही जिल्हा परिषद गटातील शहजाणपूर चकला येथील सिंदफणा नदीत गेल्या अनेक वर्षांपासून सर्रास वाळू उपसा सुरू असून तांदळवाडी आणि शहजाणपूर या दोन्ही बाजूने सिंदफणा नदीत जेसीबी पोकलेन ने दहा-दहा, वीस-वीस फुटाचे खड्डे केले आहेत. नदीपात्रात केलेल्या खड्यात पाणी साचलेले आहे. या पाण्यात बुडून या चार बालकांना आपला जीव गमवावा लागला.ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले असून जोपर्यंत वाळू उपसा करणाऱ्या लोकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली आहे.त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.वाळू माफियाकडून हप्ते घेऊन सर्रास वाळू उपसा सुरू असून यामुळे निष्पाप लोकांचे जीव जात आहेत, असे होत असताना देखील केवळ अन केवळ पैशाच्या मागे लागलेल्या महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गेवराई तालुक्यात वाळूमाफियांची दहशत वाढली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा