Subscribe Us

header ads

परळीत साकारणार 150 फूट उंचीचा तिरंगा ध्वज

बीड स्पीड न्यूज 


परळीत साकारणार 150 फूट उंचीचा तिरंगा ध्वज

विशालकाय डोंगरावर तिरंगा ध्वज, सेल्फी पॉईंट व उद्यान निर्मिती कामाचे धनंजय मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन

परळी दि। 19 - : परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या विशालकाय डोंगरावर सुमारे 75 लाख रुपये खर्चून 150 फूट उंचीचा तिरंगा ध्वज साकारणार असून, यासह सेल्फी पॉईंट, उद्यान निर्मिती आदी कामांचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शनिवारी भूमिपूजन करण्यात आले.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रभक्तीचे स्फूर्तिस्थळ म्हणून साकारण्यात येत असलेल्या या एकूण कामाचा खर्च 75 लाख रुपये असून, पुणे येथील नामांकित कंपनीच्या माध्यमातून हे काम पूर्ण केले जात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे.या विशालकाय डोंगर माथ्यावर विशाल तिरंगा ध्वजासोबतच, 'आय लव्ह परळी वैद्यनाथ' हा सेल्फी पॉईंट व उद्यान निर्मिती करण्यात येणार असून, डोंगर माथ्यावर उभारले जात असलेले हे उद्यान परळीकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.या भूमिपूजन समारंभास ना. धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक अण्णा कराड,  बाजीराव भैय्या धर्माधिकारी, कांता फड, भाऊसाहेब कराड, संग्राम गित्ते, अमर गित्ते, सुरेश नानवटे, शंकर कापसे, अमित केंद्रे, अमर रोडे तसेच नगर परिषदेचे प्रशासक डॉ. अरविंद मुंडे, नगर परिषद अभियंता श्री. बेंडले, कंपनीचे अमोल कुटे यांसह आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा