Subscribe Us

header ads

व्हिजन दापोलीचे फलीत,शैक्षणिक दर्जा उंचावला-- राजेश गुजर

बीड स्पीड न्यूज 



व्हिजन दापोलीचे फलीत,शैक्षणिक दर्जा उंचावला: राजेश गुजर

दापोली_व्हिजन दापोलीचे  यश एवढ्यात मिळेल असे वाटले न्हवते,मी मांडलेली संकल्पना यशस्वीपणे राबवलीआणि यशस्वी केली आणि तब्बल १८ मुले गुणवत्ता यादीत आली याबद्दल सर्वांचा आभारी असल्याचे माजी.सभापती आणि व्हिजनचे संकल्पक राजेश गुजर यांनी शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज सभाग्रहात आयोजीत गुणग्राहक विद्यार्थी गौरव सोहळ्यात मत व्यक्त केले.संभाव्य प्रतिनीधींना सहकार्य करा.शिवराय वाचणे,समजणे सोपे;पण अंगिकारणे एवढे सोपे नाही.शिवराय ३४२वर्षापूर्वी होऊन गेले;पण आजही छत्रपतींचे नाव घेताच अंगात एक वेगळीच स्फूर्ती मिळते.राजेंचे धडे सर्व वर्गात नाहीत;व्हिजन अंतर्गत प्रत्येक शिक्षकांनी रोज फक्त दहा मिनिटे शाळेतील मुलांना महाराजांबद्दल शिकवावे,त्याद्वारे मोठं समाजप्रबोधन होईल.यामुळे तरी सर्वांना महाराज समजतील असे सांगून यापुढे दरवर्षी शिवजयंती दिनीच  /अकरा हजार रु.चा साने  गुरुजी  आदर्श शिक्षक पुरस्कार  येत्या शै.वर्षापासून जोपर्यंत राजेश तुकाराम गुजर आणि पं.स. दापोली असेल तोपर्यंत दरवर्षी हा पुरस्कार सुरु राहील,असे अभिवचनही यावेळी गुजर यांनी दिले.अनेक उपक्रम राबवले,सुरुवातीला यश कमी मिळाले,
नंतर चढत्या क्रमाने यशाचा चढता आलेख वाढत गेला. सर्व पदाधिकारी,अधिकारी पाठीशी खंबीर असतील तर,आमचे शिक्षक अविरत झटत राहतील आणि एकाच वेळी शिष्यवृत्ती धारकतेची शंभरी पार करतील असे वचन देत, शिवजयंती निमित्ताने तालुक्याच्या गुणवत्ता वाढीचा आपण एक संकल्प करुया असे शिक्षकांना उद्देशून गटशिक्षण अधिकारी आण्णासाहेब बळवंतराव यांनी प्रास्ताविकात सांगितले.यानंतर सर्व पदाधिकारी,अधिकारी यांचा यथोचित सन्मान करणेत आला. दरम्यान तालुक्यातील वेद चव्हाण,आर्या जाधव,अमृता गायकवाड आदि.विद्यार्थ्यांनी सत्कार प्रसंगी शिक्षकांप्रति ऋणनिर्देश केला. अमृता गायकवाडने तिच्या मनोगतातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.तसेच पालक प्रतिनिधी वलेले यांनी सांगितले की व्हीजन दापोली एक ब्रॅंड बनून दापोलीचे नाव उज्वल  केले.शिक्षक प्रतिनिधी तांबीटकर,वायंगणकर आदिनी मनोगते व्यक्त केले.व्हिजन दापोली हा उपक्रमाअसाच चालू राहील.यासाठी कोणत्याही प्रकारची उणिव भासणार नाही याची ग्वाही गटविकास अधिकारी आर एम दिघे यांनी दिली.शै.गुणवत्ता विकासासाठी सदैव शिक्षणविभागाच्या पाठीशी आपण राहू असेही सुचित केले.तर आजच्या प्रेरणादायी दिनी प्रेरक असा कार्यक्रम सादर केला,याबद्दल पंचायत समिती दापोलीचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.दापोली तालुक्याचे सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य चालू असल्याचे  कामतेकर यांनी सांगितले.शिक्षण क्षेत्रातील हा कार्यक्रम अगदी भाराऊन टाकणारा असून पुढील दैदिप्यमान यशासाठी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.तसेच ध्येय साध्य करतांना आपल्यासाठी झटत असणार्‍या मार्गदर्शकांना विसरू नका. असे सभापती बांद्रे यांनी विद्यार्थ्यांना सुचक सल्ला देऊन सकारात्मक सर्व उपक्रमांसाठी पं.स.दापोली कार्यतत्पर राहील असे  त्यांनी सांगितले.सुत्रसंचालन शशिकांत बैकर,संजय मेहता यांनी तर आभार प्रदर्शन व्हिजन दापोलीचे अध्यक्ष धनंजय शिरसाठ यांनी केले.यावेळी १८ विद्यार्थ्यांसह,१००टक्के निकाल लागलेल्या १३ शाळा,प्रभाग अधिकारी,केंद्रप्रमुख तसेच मार्गदर्शक शिक्षकांचा  पं.स.दापोली च्या वतीने मान्यवरांचे हस्ते गौरव करणेत आला.
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी,व्हिजन मुख्य समिती,तसेच कार्यालयीन कर्मचार्‍यांनी विशेष प्रयत्न केले.यावेळी जि.प. सदस्य,पं.स.सदस्य,विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख,शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा