Subscribe Us

header ads

राक्षस भुवन ( देवीचे) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

राक्षस भुवन ( देवीचे) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन



वाकनाथपुर प्रतिनिधीछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या वर्षी गावोगावी उत्साहात साजरी होत आहे. याच प्रमाणे बीड तालुक्यातील राक्षस भुवन ( देवीचे) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त विविध 

कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. काल दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर 

आधारित विद्यार्थ्याने भाषण केले. आणि आज दिनांक २०फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे शिवपुजन भारतीय सैन्यदलात असणारे सचीण नवनाथ लोणकर यांच्या हस्ते करण्यात आले आणि 

कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत अवधूत शामसुंदर लोणकर  यांनी निभावली तर माँसाहेब जिजाऊ च्या भूमिकेत प्रतीक्षा बबन लोणकर यांनी खुप छान भूमिका निभावली तर बाकी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गाण्यावर शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीने या बाल कलाकाराने नृत्य सादर केले. या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक आणि सूत्रसंचालन कृष्णा लहू गाडे सर यांनी केले या कार्यक्रमाला पंचकृषीतील नागरिकांची मोठी उपस्थीती होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा