Subscribe Us

header ads

संत नरहरी महाराज पुण्यतिथी दिनी पत्रकारांचा सन्मान सोहळा

बीड स्पीड न्यूज 

(वृत्तसंकलनःआत्माराम ढेकळे,अनिल उंबरकर)


संत नरहरी महाराज पुण्यतिथी दिनी पत्रकारांचा सन्मान सोहळा

अकोला :  श्री.द्वारकाधीश  प्रतिष्ठान नागपूर, ऑल इंडिया सोनार फेडरेशन व अखिल माळवी  सोनार समाज महासंघ यांचे संयुक्त विद्यमाने यंदाचा श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा विदर्भातील अकोला येथे आयोजित करण्यात आला आहे.त्या अनुषंगाने १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या पत्रकार बांधवांचा या सोहळ्यात सन्मान होणार आहे.श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा व  त्या अनुषंगाने पत्रकारांचा सन्मान हा योग जुळून आणला तो श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान  नागपूरच्या अध्यक्षा तथा प्रसिद्ध भागवत कथा प्रवचनकार सौ.अंजलीताई अनासाने  संकल्पित केलेला हा सोहळा श्री संत नरहरी सेवा समाज समितीचे अध्यक्ष चंद्रकांत  वासुदेव हिरूळकर , ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे अध्यक्ष मोहनसेठ हिवरकर, अखिल माळवी सोनार महासंघाचे अध्यक्ष तथा द्वारकाधिश प्रतिष्ठानचे सचिव विलासराव अनासाने, राष्ट्रीय सर्व स्वर्णकार महासभाचे राष्ट्रीय  उपाध्यक्ष तथा द्वारकाधीश प्रतिष्ठान चे सहसचिव  अनंतराव उंबरकर व सहकारी  यांच्या सहकार्याने हा भव्य दिव्य  सोहळा संपन्न होणार आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणारे पत्रकार  समाजात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब आपल्या लेखणीतून उमटून समाजाला ज्ञात ,सजग करतात.तसेच जनजागृतीचे कार्य देखील प्रसिद्धी माध्यमातून होत असते. समाजात आदर्श घडविणारे पत्रकार बांधव यांचा सन्मान व्हावा ही इच्छा व्यक्त करून त्यांना सन्मानित करण्याची संकल्पना द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा प्रसिद्ध प्रवचनकार सौ. अंजलीताई सुरेशराव अनासने यांनी व्यक्त केली.  त्यानुसार येत्या १९ फेब्रुवारी २०२२रोजी अकोला येथे हा पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे.असे श्री संत नरहरी सेवा समाज समिती, ऑल इंडिया सोनार फेडरेशन, अखिल माळवी  सोनार महासंघ व द्वारकाधीश प्रतिष्ठान नागपूर यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा