Subscribe Us

header ads

IPL Auction 2022 Live ; या’ खेळाडूला पहिला मान; ८.२५ कोटींची लागली बोली!

बीड स्पीड न्यूज 


IPL Auction 2022 Live, Day 1-: जगातील श्रीमंत टी-२० क्रिकेट लीग म्हणजे आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी दोन दिवस मेगा ऑक्शन होत आहे. आज या महालिलावाचा पहिला दिवस आहे. यावेळी, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्ससह लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ लीगमध्ये सहभागी झाले आहेत. बंगळुरू येथे आज आणि उद्या रंगणाऱ्या या महालिलावात एकूण ५९० खेळाडू आपले नशीब आजमावताना दिसतील.

वॉर्नरसाठी बोली

सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरसाठी ६.२५ कोटी देत दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ताफ्यात सामील केले.


क्विंटन डी कॉकसाठी बोली

धाकड सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉकला ६.७५ कोटींची बोली लावत लखनऊ सुपर जायंट्सने संघात घेतले.


फाफ डु प्लेसिससाठी बोली

डु प्लेसिसला ७ कोटी देत आरसीबीने संघात घेतले.


मोहम्मद शमीसाठी बोली

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बोली उघडली. शमीला ६.२५ कोटी देत गुजरात टायटन्सने संघात घेतले.


मुंबईकर श्रेयस अय्यरसाठी बोली

बंगळुरूने अय्यरसाठी बोली लावली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सनेही रस दाखवला. शेवटी केकेआरने १२.२५ कोटींमध्ये अय्यरला संघात घेतले.


ट्रेंट बोल्टसाठी बोली

वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टसाठी सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने बोली लावली. राजस्थान रॉयल्सने ८ कोटी देत बोल्टला संघात घेतले.


कगिसो रबाडासाठी बोली

पंजाब संघाने ९.२५ कोटी इतक्या किमतीला रबाडाला संघात घेतले आहे.


पॅट कमिन्ससाठी बोली

वेगवान गोलंदाज पॅट कमिन्ससाठी कोलकाता नाइट रायडर्सने बोलीची सुरुवात केली. गुजरात टायटन्सने कमिन्ससाठी बोली लावली. केकेआरने ७.२५ कोटींमध्ये कमिन्सला संघात घेतले.


रवीचंद्रन अश्विनसाठी बोली

अश्विनला संघात घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सने रस दाखवला. राजस्थानने ५ कोटींमध्ये अश्विनला आपल्या संघात घेतले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा