Subscribe Us

header ads

पत्रकारांच्या मान-सन्मानमध्ये आत्माराम ढेकळे यांना बहुमान

बीड स्पीड न्यूज 


पत्रकारांच्या मान-सन्मानमध्ये आत्माराम ढेकळे यांना बहुमान

पुणेः  समाज संघटनांनी एकत्र येऊन श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .त्यामध्ये "पत्रकार बांधवांच्या सन्मान सोहळ्यात पुणे येथील मुक्त पत्रकार आत्माराम ढेकळे यांनाही बहुमान मिळाल्याबद्दल समाजातुन त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे. विविध समाज संघटनेच्या माध्यमातून पदाधिकारी विलासराव अनासने,मोहनसेठ हिवरकर,अनंतराव उंबरकर,सौ.अंजलीताई अनासने या आयोजकांनी अकोला येथे दि.१९ फेब्रुवारी २०२२ रोजी 'संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामध्ये "पत्रकार बांधवाचा मान-सन्मान सोहळा आयोजित केला आहे.सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या पत्रकारांचा समावेश आहे.सन १९८२ पासुन महाराष्ट्र ,गुजरात ,उत्तरप्रदेश मधील प्रथितयश अंकासाठी संवाददाता,पत्रकार म्हणून कार्यरत मुक्त पत्रकार आत्माराम ढेकळे यांचाही या मान-सन्मानमध्ये समावेश आहे त्याबद्दल चंद्रकांत दिक्षीत,सुर्यकांत खोल्लम,चंद्रकांत पाटणकर,नामदेव सुवर्णकार,सुर्यकांत बागडे,गजानन शेरेकर,सौ.अर्चना सोनार, दत्ता साबनकर,श्याम पावटेकर,स्वप्नील पावटेकर,विवेक मिसाळ आदींनी कौतुक करुन अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा