Subscribe Us

header ads

मृतावस्थेतील बिबट्या आढळल्याने गेवराई तालुक्यात खळबळ

बीड स्पीड न्यूज 


मृतावस्थेतील बिबट्या आढळल्याने गेवराई तालुक्यात खळबळ


गेवराई _तालुक्यातील राक्षसभुवन (शनीचे) शिवारात आज शुक्रवारी (दि.११) एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा बिबटया अंदाजे तीन वर्षाचा असावा असा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे, वनपाल सातपुते, वनरक्षक गाडेकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन शिवारातील एका ओढ्यात आज दुपारी बिबट्या ग्रामस्थांच्या नजरेस पडला.याची गावात माहिती मिळताच ग्रामस्थांनी बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. परंतु या बिबट्याचा मृत्यु कशामुळे झाला. यामागील कारण काहीच स्पष्ट झाले नाही. दुपारी याबाबत वनाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ते आता यामागील कारण शोधून काढतील. दरम्यान, या बिबट्याच्या मृत्यूमागचे कारण अद्याप निष्पन्न होऊ शकले नाही. शवविच्छेदनानंतर याबाबत उलगडा होऊ शकेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.परंतु मृतावस्थेत बिबट्या आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा