Subscribe Us

header ads

आदर्श व्यापारी मार्केट असाेसिएशनच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे पाेलिस अधिक्षकांच्या हस्ते लाेकार्पण

बीड स्पीड न्यूज 

जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सीसीटिव्ही कॅमेरे सुरू केल्यास दुकानांसह
रस्त्यांवरील नागरिक सुरक्षीत हाेईल, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळेल पाेलिस अधिक्षक अार. राजा यांचे प्रतिपादन

आदर्श व्यापारी मार्केट असाेसिएशनच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे पाेलिस अधिक्षकांच्या हस्ते लाेकार्पण




बीड_बीड शहरातील सुभाषराेडवरील आदर्श व्यापारी मार्केट असाेसिएशनकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चातून १० सीसीटीव्ही कॅमेरे बसण्याचे नियाेजन करुन चार कॅमेरे कार्यान्वीत केले, हे काम काैतुकास्पद अाहे. या कॅमेऱ्यांच्या निघरानिमुळे शहरातील नागरिकांना फायदा हाेणार अाहे. बीड शहरातील आदर्श व्यापारी मार्केट असाेसिएशनच्या उपक्रमाप्रमाणेच जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी दुकान परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे सुरू केल्यास स्वत:इतरांना सुरक्षीतता जनहितार्थ निर्माण करणे शक्य अाहे. त्यातूनच गुन्हेगारीवर नियंत्रण िमळवण्यास मदत हाेईल,असे प्रतिपादन पाेलिस अधिक्षक अार. राजा यांनी केले.बीड शहरातील आदर्श व्यापारी मार्केट असाेसिएशन कडून ८१ गाळ्यांसमाेर सीसीटिव्ही कॅमेरे बसवून त्याचे लाेकार्पण कार्यक्रम शुक्रवारी (दि. ११) जिल्हा पाेलिस अधिक्षक अार. राजा यांच्या हस्ते करण्यात अाले. शहर पाेलिस स्टेशन येथे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पाेलिस उपाधिक्षक संताेष वाळके, पाेलिस निरीक्षक रवी सानप, दैनिक लाेकाशाचे कार्यकारी संपादक भागवत तावरे, 

दैिनक दिव्य मराठी चे पत्रकार रवी उबाळे, दैनिक लाेकमत चे पत्रकार संजय तिपाले, दैनिक पार्श्वभूमीचे पत्रकार चंदन पठाण उपस्थित हाेते.पाेलिस अधिक्षक राजा म्हणाले,  बीड शहरातील आदर्श व्यापारी मार्केट असाेसिएशनने कमी कालावधीमध्ये पाेलिस दलाच्या अाहवानाला प्रतिसाद देऊन दुकान परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवून कार्यान्वीत केले हे काम अादर्शच अाहे. त्यामुळे परिसरातील दुकाने, नागरिक, महिलांसह वाहतूकदारांना सुरक्षा मिळणार अाहे. तसेच पाेलिस प्रशासनालाही मदत हाेईल. पाेलिस उपाधिक्षक वाळके म्हणाले, काेराेना नंतर जिल्ह्याच्या अाढावा घेताना पाेलिस अधिक्षक यांनी सर्व उपविभागातील व्यापाऱ्यांच्या पुढाकारातून कॅमेरे बसून सुरक्षेसंदर्भात निर्देश दिले हाेते. त्यानुसार बीड शहरातील आदर्श व्यापारी मार्केट असाेसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिसाद देत सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याचा पहिला उपक्रम राबवला अाहे. त्यामुळे बीड शहरातील इतर भागातील व्यापाऱ्यांनी असे उपक्रम राबवून स्वत:सह इतरांना मदत करावी, असेही अावाहन त्यांनी केले. पत्रकार तावरे म्हणाले, अाम्ही नागरिक म्हणून जगत असताना शहरात काही घडले, चाेरी झाली, गुन्हे झाले तर त्याची उकल करण्याची जबाबदारी ही पाेलिसांची अाहे, ते अापले काम नाही, असे म्हणून सतत दुर्लक्ष केले जाते. पाेलिस प्रशासनाला नागरिक, व्यापारी, समाजातील प्रत्येकांनी सहकार्य करणे गरजेचे अाहे, तरच गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे शक्य अाहे. आदर्श व्यापारी मार्केट असाेसिएशनने त्यांच्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवून पाेलिस दलास जे सहकार्याची भूमीका घेतली ती अभिनंदन करणारी अाहे, असे त्यांनी सांगितले. पत्रकार उबाळे म्हणले, आदर्श व्यापारी मार्केट 

असाेसिएशनचे पदाधिकारी हे व्यापार करत असताना प्रशासनाच्या प्रत्येक लाेकपयाेगी उपक्रमात सहभाग नाेंदवात. शहरात स्वच्छता माेहिम,शहरातील अाेपन स्पेसमध्ये वृक्षाराेपन, रक्तदान शिबीर, पाेलिसांसाठी मदत कार्य करतात. काही दिवसापूर्वी पाेलिस दलाकडून व्यापाऱ्यांनी दुकान परिसरात कॅमेरे बसवण्याचे अावाहन केले, त्यालाही प्रतिसाद देत हा पहिला उपक्रम बीड शहरातील सुभाष राेडवर आदर्श व्यापारी मार्केट असाेसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी राबवला अाहे, त्यातून व्यापाऱ्यांना संरक्षण तर पाेलिसाना मदतकार्य हाेईल, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक व सुत्रसंचलन सुदाम चव्हाण यांनी केले तर अाभार प्रकाश कानगावकर यांनी मानले.यावेळी कार्यक्रमास आदर्श मार्केट व्यापारी संघटनेचे शेख मेहबूब, सुभाष उगले, गणेश मुळे, अरूण देवधरे, महोमद चाऊस, अजित सांबरे विनायक पतंगे, त्रिमुखे, निलेश पतंगे, गोविंद खेडकर, नाना वाघमारे, अविनाश कानगांवकर, देविदास मसुरे, दिपक पतंगे, मच्छिंद्र उपरे, गजानन मानकुस,अमित जैन सांबरे राजेश फुटाणे, सिध्दार्थ किवणे, पटेल अभुजा, आप्पा औताडे, असिफ खान,मुन्ना शेख, शेख शमशाद शेख अदन शेख शेरू, शेख मज्जीद, कैलास उपरे, ज्ञानेश्वर चव्हाण, ज्ञानेश्वर पंधारे, विलास पतंगे, रवी वानखेडे, गणेश राऊत, राहुल शिंदे, देविदास नेरे, शुभम पाखरे, सुमित सांबरे पटेल अफजल खान यांच्यासह आदर्श मार्केट व्यापारी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
-----

दाेन दिवसात कॅमेरे केले सुरू

आदर्श व्यापारी मार्केट असाेसिएशनच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन बैठक घेतली. त्यातून अापल्या ८१ दुकानांच्या परिसरातील सरासरी अर्धा किलाेमीटर अंतर कॅमेऱ्याच्या निघराणी खाली अाणण्याचे ठरले. त्यासाठी जाे खर्च हाेईल ताे असाेसिएशनच्या निधी संकलातून करण्याचे नियाेजन झाले. दाेन दिवासात आदर्श व्यापारी मार्केट असाेसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी उत्तम कॅमेऱ्यांच्या निवड करुन शुक्रवारी (दि. ११) चार कॅमेरे कार्यन्वीत केले.प्रकाश कानगावकर, अध्यक्ष, आदर्श व्यापारी मार्केट असाेसिएशन
----

पाेलिस प्रशासनाच्या अाहवानाला पहिला प्रतिसाद

काेराेना काळानंतर चाेरीचे प्रमाण वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय केले पाहिजे, यासाठी जिल्हा पाेलिस प्रशासनाच्या निर्देशानुसार शहर पाेलिस ठाण्यामध्ये काही दिवसापूर्वी व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात अाली. त्यात व्यापाऱ्यांच्या पुढाकारातून दुकानांच्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याचे अावाहन करण्यात अाले. यास प्रतिसाद देत बीड शहरातील सुभाष राेडवरील आदर्श व्यापारी मार्केट असाेसिएशनने ८१ गाळ्यांच्या परिसरात स्वखर्चाने तब्बल १० कॅमेऱ्यांचे नियाेजन केले तसेच पाेलिस प्रशासनाच्या अाहवानाला पहिला प्रतिसाद दिला अाहे.सुदाम चव्हाण, सचिव, आदर्श व्यापारी मार्केट असाेसिएशन
-------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा