Subscribe Us

header ads

जिल्ह्याच्या ठिकाणाला न.प.च्या सत्ताधाऱ्यांनी कचराकुंडीचे स्वरूप दिले-आ.क्षीरसागर भैयांचा डायलॉग, मै झुकुंगा नही आणि टाळ्यांचा कडकडाट

बीड स्पीड न्यूज 

जिल्ह्याच्या ठिकाणाला न.प.च्या सत्ताधाऱ्यांनी कचराकुंडीचे स्वरूप दिले-आ.क्षीरसागर
भैयांचा डायलॉग, मै झुकुंगा नही आणि टाळ्यांचा कडकडाट


बीड (प्रतिनिधी):- बीड शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या शहराला एक वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. असे असताना देखील मागील तीस वर्षांपासून एक हाती सत्ता असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना बीड शहराचा विकास करावा वाटला नाही ही खंत कायम जाणवते. बीड शहराची कचराकुंडी करणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना आता त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. असे विधान करत असतानाच आ संदीप भैया यांनी पुष्पा पिक्चर मधला प्रसिद्ध डायलॉग मै झुकूंगा नही म्हणताच उपस्थितांनी मधून टाळ्यांचा कडकडात ऐकायला मिळाला. माळीवेस येथील युवा कार्यकर्ते निखिल सवाई यांच्या प्रवेशा स कार्यक्रम काल रात्री पार पडला त्याप्रसंगी आ. संदीप भैय्या क्षीरसागर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आ. सय्यद सलीम, माजी आ. सुनील धांडे, केके वडमारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.मागच्या 25 वर्षापासून नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना बीडच्या जनतेने भरभरून प्रेम केले. जनता एक हाती सत्ता देत असताना देखील त्याचा सदुपयोग न करता केवळ सत्तेचा वापर हा स्वतःच्या स्वार्थासाठी करण्यात आला. मागच्या अनेक वर्षांपासून बीडच्या जनतेने कधीही सिमेंटचे रोड पाहिले नव्हते परंतु आताच सिमेंटचे रस्ते करण्याचे कारण काय असा सवालही आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी विचारला. मागच्या दोन वर्षांपासून बीडला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही तलावांमध्ये भरपूर पाणी साठा उपलब्ध आहे असे असतानाही जनतेला बारा ते पंधरा दिवसाआड पाणी उपलब्ध केले जाते. सत्ताधाऱ्यांच्या अयोग्य नियोजनामुळे बीड जनतेवर ही वेळ ओढवली आहे. आगामी काळात राष्ट्रवादीच्या चिन्हावर बीड शहरामध्ये 52 उमेदवार उभा करणार आहे माय बाप जनतेनी एक हाती सत्ता दिली तर येणाऱ्या वर्षभरात बीडचा चेहरा बदलून दाखवेल अशी भावना आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी व्यक्त केली. आम्ही मोठाले आश्वासन कधीही देत नाहीत परंतु जी आश्वासनं आम्ही आमदारकीच्या निवडणुकीवेळी दिली त्यातील बहुतांश कामे आज पूर्ण झाली आहेत व काही होत आहेत. आम्ही ताजमहल बांधू, विमानतळ आणू अशा मोठ्या गप्पा करणार नाहीत परंतु सामान्य नागरिकांसाठी महत्वाच्या असणाऱ्या रस्ता पाणी व नाली या मूलभूत गरजा मात्र आम्ही नक्कीच पूर्ण करुत असे म्हणत असतानाच आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांनी गुंठेवारी चा पैसा नगरपालिकेला प्राप्त झाला तो गेला कुठे ? असा प्रश्न देखील उपस्थित केला. आज पर्यंत बीड शहरात केवळ गुत्तेदार यांना पोसण्यासाठी कामे होत होती त्यामुळेच बीडच्या रस्त्यांची वाट लागली आता पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने आम्ही सिमेंटचे रस्ते उपलब्ध करून दिले अशा गप्पा विरोधक मारत आहेत परंतु हे सिमेंटचे रस्ते आमच्या दबावामुळेच करण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा