Subscribe Us

header ads

बीड शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होणार अमृत योजनेचे वीज कनेक्शन जोडले जाणार; आ.संदीप क्षीरसागरांच्या पुढाकारातून राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंकडून बैठक

बीड स्पीड न्यूज 


बीड शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होणार
अमृत योजनेचे वीज कनेक्शन जोडले जाणार; आ.संदीप क्षीरसागरांच्या पुढाकारातून राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंकडून बैठक




बीड (प्रतिनिधी):- बीड शहराला तीन दिवसाला सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी 90 टक्के काम पुर्ण झालेल्या अमृत योजनेला वीज कनेक्शन जोडून पाणी पुरवठा सुरू करणे गरजेचे आहे. परंतू बीड नगर परिषदेने 26 कोटी रूपये महावितरणचे थकवल्यामुळे सदर वीज कनेक्शन दिले जात नव्हते. मागील आठवड्यात उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे बैठक झाल्यानंतर आता पुन्हा बुधवारी याप्रश्नी बैठक घेवून वीज कनेक्शन जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे वीज कनेक्शन जोडल्यानंतर बीड शहराला तीन दिवसाला सुरळीतपाणी पुरवठा करण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यासाठी आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.बीड शहरातील गावठाण भागात व शहराच्या हद्दवाढ भागात पाणी पुरवठा वेळेवर होत नाही. कधी 15 तर कधी 20 दिवसाला पाणी येते. विशेष म्हणजे अमृत योजनेचे 90 टक्के काम पुर्ण झालेले असतांना केवळ 

वीज कनेक्शन जोडले जात नसल्याने शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यास मोठ्या अडचणी निर्माण होतहोत्या. या बाबत आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा करून सदर प्रश्न आता निकाली काढला आहे. मागील आठवड्यात उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे याबाबत आढावा बैठक झाली. त्या आढावा बैठकीनंतर बीड नगर परिषदेने टप्प्याटप्याने थकबाकी भरेल असा प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव सादर केल्यानंतर उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तातडीने वीज कनेक्शन जोडण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. हे वीज कनेक्शन जोडल्यानंतर बीड शहराचा विस्कळीत झालेला पाणी पुरवठा लवकरच सुरू होणार आहे. मंत्रालयात झालेल्या या बैठकीला उर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, उर्जा विभागाचे सीएमडी विजय सिंघल, माजी आ.सय्यद सलीम यांची विशेष उपस्थिती होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा