Subscribe Us

header ads

दिवसाढवळ्या बँकेसमोरून सव्वा लाखांच्या रकमेची बॅग लंपास

बीड स्पीड न्यूज 

दिवसाढवळ्या बँकेसमोरून सव्वा लाखांच्या रकमेची बॅग लंपास

अंबाजोगाई_ शहरातील एका व्यापाऱ्याचे दहा लाखांचे दागिने लुटल्याची घटना ताजी असतानाच चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना उघड आव्हान देत दिवसाढवळ्या एका बँकेसमोरून १ लाख ३३ हजारांची रक्कम असलेली बॅग लंपास केली. ही घटना मंगळवारी (दि. १६) दुपारी बँक ऑफ इंडिया समोर घडली.अंबाजोगाई तालुक्यातील अंजनपूर येथील विजयकुमार तुळशीराम इस्ताळकर हे धानोरा येथील मतीमंद विद्यालयात निदेशक आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार, ते वडिलांसोबत दुचाकीवरून (एमएच ४४ इ ९४६२) मोंढ्यातील महाराष्ट्र बँकेत गेले. तिथून त्यांनी पगाराच्या खात्यातून १ लाख ३३ हजार रुपये काढले. ती रक्कम एका कापडी पिशवीत ठेवून  ती पिशवी हँडलला अडकवली आणि जयवंती नगर मधील  बँक ऑफ इंडियात जमा करण्यासाठी आले. बँकेसमोर गाडी  लॉक करत असताना पाळत ठेवून असलेल्या दुचाकीवरील दोघा चोरट्यानी ती पिशवी लंपास करून पोबारा केला.हि बाब लक्षात आल्याने इस्ताळकर पितापुत्रांनी त्या चोरट्यांचा एसआरटी महाविद्यालयापर्यंत पाठलाग केला परंतु ते हाताला लागले नाहीत. सदर फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पो.कॉ. नरहरी नागरगोजे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा