Subscribe Us

header ads

ट्रॅक्टर-पिकअपचा भीषण अपघात; बाप-लेक जागीच ठार, ३ जखमी

बीड स्पीड न्यूज 

ट्रॅक्टर-पिकअपचा भीषण अपघात; बाप-लेक जागीच ठार, ३ जखमी


गेवराई_ तालुक्यातील राक्षसभुवन रोडवर रात्री अकराच्या सुमारास भीषण अपघात झाला. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व पिकअपची जोरदार धडक झाली. यामधे दोन जण जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अपघात इतका भीषण होता की यामध्ये बाप-लेक जागीच ठार झाले. चंद्रशेखर शामराज पाठक ( वय 39) वर्ष व त्यांचा मुलगा आर्यन चंद्रशेखर पाठक ( वय 12 )वर्ष दोघे रा. राक्षसभुवन यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी मंजरी चंद्रशेखर पाठक ( वय 11) वर्ष हिच्या सह इतर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी घटना स्थळी धाव घेऊन पंचनामा करुन शव विच्छेदना साठी तात्काळ गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा