Subscribe Us

header ads

बोगस अधिका-यांकडून शासनाची फसवणूक व आर्थिक लूट: सुशिलकुमार पावरा

बीड स्पीड न्यूज 



बोगस अधिका-यांकडून शासनाची फसवणूक व आर्थिक लूट: सुशिलकुमार पावरा

प्रमाणपत्रे खोटी ठरली,जिल्हा परिषद कारवाई कधी करणार?: सुशिलकुमार पावरा

दापोली :नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांची आग्रा विद्यापिठाची बी.एड.ची पदवी तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक किरण लोहार यांनी अवैद्य ठरविली आहे. सबब" हिंदी पारंगत परीक्षा " ही परीक्षा विस्तार अधिकारी( शिक्षण) या पदासाठी विहीत केलेली व्यवसायिक पात्रता म्हणून ग्राह्य धरता येणार नाही  तसा स्पष्ट उल्लेख केलेला चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना दिलेला आहे. नंदलाल कचरू शिंदे यांनी आग्रा विद्यापिठाच्या बी.एड.  पदवीद्वारे शिक्षण विस्तार अधिकारी पदाची नोकरी मिळवली.शिक्षण विस्तार अधिकारी पदाची पात्रता नाही, हे चौकशी अहवालात सिद्ध झाले आहे. तरी जिल्हा परिषद रत्नागिरी प्रशासनाने नंदलाल कचरू शिंदे यांना नोकरीवर ठेवले कसे?पात्रता नसताना नोकरी वर ठेवून दरमहा या बोगस अधिका-यांना दरमहा लाखो रुपये  पगार दिला जात आहे. ही तर एक प्रकारची शासनाची फसवणूक व आर्थिक लूट करणे प्रकार आहे.विजय दाजी बाईत शिक्षण विस्तार अधिकारी खेड  यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारे अपंगत्व नसताना अपंग प्रमाणपत्राआधारे नोकरी मिळवली व अपंगाचे सर्व शासकीय  फायदे घेतले. 30 ते 35 वर्षे अपंग म्हणून विजय दाजी बाईत यांनी जादा पगार घेऊन व खोटे अपंग प्रमाणपत्र बाळगून शासनाची फसवणूक केली आहे.गटविकास अधिकारी दापोली, गटविकास अधिकारी गुहागर व शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी या त्रिसमीतीय सदस्य समितीने दिनांक 4/10/2018 रोजीच्या चौकशी अहवालात अपंग प्रमाणपत्र अवैद्य ठरवले आहे.विजय दाजी बाईत यांनी आपल्या खोट्या  अपंग प्रमाणपत्राची मुख्य कार्यकारी अधिकारी यांची  पूर्व परवानगी न घेता परस्पर अपंगत्वाच्या लाभाचा फायदा घेतलेला आहे ,असा स्पष्ट उल्लेख केलेला चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना दिलेला आहे.विजय दाजी बाईत हे नुसते खोटे अपंग प्रमाणपत्र प्रकरणातच नव्हे तर बदली शिक्षकांकडून प्रत्येकी 22 हजार रुपये घेऊन  भ्रष्टाचार करणे,शिक्षकाविरोधात षडयंत्र रचणे, शिक्षकांकडून आर्थिक मागणी करणे,महिला कर्मचा-यांचा छळ करणे इत्यादी गंभीर प्रकरणात सुद्धा दोषी ठरले आहेत.बोगस प्रमाणपत्राआधारे नोकरी मिळविणा-या व पात्रता नसतानाही दरमहा  लाखो रुपये पगार  घेऊन शासनाची फसवणूक व आर्थिक लूट करणा-या या बोगस अधिका-यांकडून आर्थिक वसुली करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, बोगस अधिका-यांवर  कडक कारवाई झालीच पाहिजे ,अशी मागणी उपोषणकर्ते शिक्षक सुशिलकुमार पावरा करत आहेत.या दोषी व बोगस अधिका- यांना सेवेतून  बडतर्फ करा व माझी दोन मूळ कागदपत्रे दोन लाख दंडाच्या रकमेसह परत करा अशा मागण्यासाठी शिक्षक सुशिलकुमार पावरा यांचे दापोलीत उपोषण सुरूच आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा